संयुक्त अरब अमिरातीमधील (यूएई) (BAPS Hindu Mandir) पहिले भव्य हिंदू मंदिर अबू धाबी येथे उभारले जाणार आहे. या हिंदू मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुढच्या वर्षी १४ फेब्रुवारीला होणार आहे.
मंदिराच्या शिष्टमंडळ गुरुवारी, (२८ डिसेंबर) नवी दिल्लीतील पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. BAPS स्वामीनारायण संस्थेकडून पूज्य ईश्वरचरण स्वामी आणि पूज्य ब्रह्मविहारी स्वामीजी यांनी गुरुवर्य महंत स्वामीजी यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांना मंदिराच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले आहे. मंदिराच्या शिष्टमंडळाकडून निमंत्रण पत्रिका स्वीकारताना काढलेली छायाचित्रे सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.
(हेही वाचा – UPI App Payment Alert : नवीन वर्षात ‘यांचे’ Gpay, Paytm आणि Phonepe अकाऊंट होणार बंद)
पंतप्रधानांच्या भेटीनंतर मंदिराच्या शिष्टमंडळाने BAPS स्वामीनारायण संस्थेकडून सोशल मिडियावर ‘X’वर लिहिले आहे की, अबुधाबीमध्ये १४ फेब्रुवारी २०२४ला बीएपीएस हिंदू मंदिराचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव आणि लोकार्पण समारंभ साजरा केला जाणार आहे. भारताकडून या भव्यदिव्य मंदिराच्या उद्घाटना समारंभाकरिता पंतप्रधानांना आमंत्रित करण्यात येत आहे. हे आमंत्रण पंतप्रधानांनी स्वीकारले आहे. यावेळी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमधील संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेने हे मंदिर एक महत्त्वाचे पाऊल मानले जाते तसेच मंदिराचे बांधकाम हा भारत आणि संयुक्त अरब अमिरातीचा संयुक्त उपक्रम आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
अबू धाबी येथील हिंदू मंदिराच्या शिष्टमंडळाची पंतप्रधान मोदींसोबत सुमारे एक तास अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत काळात, जागतिक सलोख्यासाठी हिंदू मंदिराचे महत्त्व आणि जागतिक स्तरावर भारताच्या आध्यात्मिक नेतृत्वासाठी मोदींचा दृष्टीकोन यावरही त्यांनी चर्चा केली.
प्राचीन शैली आणि आधुनिक नक्षीकाम…
अल वक्बा साइटवर 20,000 चौरस मीटर जमिनीवर बांधलेले हे अबू धाबीमधील पहिले हिंदू मंदिर आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन शैलीतील असून मंदिराची वास्तुकला आधुनिक असून अतिशय अप्रतिम असे नक्षीकाम मंदिराच्या भिंती आणि खांबांवर केलेले आहे. मंदिराच्या संकेतस्थळानुसार, हे मंदिर शाही, पारंपरिक हाताने कोरलेल्या दगडांनी बांधण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराची पायाभरणी २०१८ ला केली होती.
पूज्य ईश्वरचरण स्वामीजी एवं पूज्य ब्रह्मविहारी स्वामीजी ने गुरुवर्य महंत स्वामीजी की ओर से आबूधाबी, यूएई में फरवरी 14,2024 को प्रतिष्ठित होनेवाले @BAPS हिंदू मंदिर के प्राण प्रतिष्ठा महोत्सव एवं लोकार्पण समारोह में गौरवशाली उपस्थिति के लिए भारत के प्रधानमंत्री श्री @narendramodi… pic.twitter.com/kIVx6g0WNL
— BAPS-DivineDarshan (@DivineDarshan1) December 28, 2023
हेही पहा –