बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानच्या संस्थेमध्ये नमो महारोजगाराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले की, बारामती शहर राज्यासाठी विकासाचं मॉडेल ठरेल. बारामतीमध्ये पोलिसांना चांगल्या सोयीसुविधा देण्यात आल्या आहेत. आमचं सरकार लोकाभिमूख सरकार आहे. विकासाच्या कामात आमचं सरकार राजकारण आणत नाही हे आज स्पष्ट झालं आहे. (CM Eknath Shinde)
राज्यात अशाच प्रकारचे मेळावे घेण्यात येतील. सर्वसमावेशकतेचं राजकारण आपल्याला करायचं आहे. ७५ हजारांपेक्षा जास्त रोजगारनिर्मिती झाली आहे. त्यात आणखी वाढ होत आहे. बारामतीमध्ये २५ हजार जणांना रोजगार दिला जात आहे. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्यात आलं आहे. नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण ठेवण्यात येणार आहे, असं शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले आहेत.
(हेही वाचा – Gautam Gambhir कडून राजकीय संन्यासाची घोषणा; क्रिकेट करिअरवर करणार लक्ष केंद्रीत)
२ कोटी ६० लाख लोकांना ‘शासन आपल्या दारी’मधून लाभ
बारामती झालेल्या नवीन इमारती या दर्जेदार आहेत. पोलिसांच्या नवीन इमारती दर्जेदार आहेत. पोलीस कधी ही पाहिलं तर ऊन, वारा, पावसामध्ये ते बाहेर असतात. आजच्या मंचावर पवार साहेब पण आहेत आणि अजित दादा सुद्धा आहेत. विकास कामात आम्ही राजकारण आणू इच्छित नाहीत. हे पहिलं सरकार असेल की सिलेक्शन झालं की अपॉइंटमेंट द्यायला लगेच तयार आहे, असं शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)
शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेला लाभ मिळत आहे. सर्वांना एकाच छताखाली सर्व सुविधा मिळत आहेत. २ कोटी ६० लाख लोकांना याचा लाभ मिळाला आहे. राज्याचं भवितव्य घडवण्याची तरुणांना संधी आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये स्कील डेव्हलपमेंटला महत्त्व देण्यात आलं आहे, असं शिंदे म्हणाले. (CM Eknath Shinde)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community