Baramati Rojgar Mela: रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूल, जितेंद्र आव्हाड यांनी “X” पोस्टद्वारे सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्यावर साधला निशाणा

या मेळाव्यात एकूण ४०० कंपन्यांपैकी फक्त १८ कंपन्या पुणे जिल्ह्याबाहेरील होत्या. त्यामध्ये सोलापूरमधील एक, सांगलीतील एक आणि मुंबईच्या एका कंपनीचा समावेश आहे, जर पुणे जिल्ह्यात खरोखर एवढे रोजगार असतील, तर पुणे शहराला एवढ्या लोकसंख्येचा भार उचलता येणार आहे का? मर्यादित संसाधने असताना या लोकसंख्येला कसे सामावून घेतले जाणार आहे? याचे उत्तर सरकारकडे नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

159
Baramati Rojgar Mela: रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूल, जितेंद्र आव्हाड यांनी
Baramati Rojgar Mela: रोजगार मेळावा म्हणजे बेरोजगारांची दिशाभूल, जितेंद्र आव्हाड यांनी "X" पोस्टद्वारे सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्यावर साधला निशाणा

रोजगार मेळावा (Baramati Employment Fair) म्हणजे बेरोजगारांची (Baramati Rojgar Mela) दिशाभूल आहे. सरकारने या मेळाव्याच्या माध्यमातून ४६ हजार नोकऱ्या देण्याचा दावा केला, पण प्रत्यक्षात ३६ हजार नोकऱ्या ट्रेनी स्वरुपाच्या आहेत. राज्य सरकारने बारामतीत आयोजित केलेल्या नमो महारोजगार मेळाव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी एका विस्तृत “X” पोस्टद्वारे सरकारच्या नमो महारोजगार मेळाव्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, बारामतीतील नमो रोजगार मेळावा म्हणजे सामान्य बेरोजगार तरुणांची दिशाभूलच सरकारने केल्याचे स्पष्ट होत आहे.बारामतील झालेल्या या मेळाव्याला किती लोकांना, किती पगाराच्या कायमस्वरुपी नोकऱ्या मिळाल्या. हे सरकारने जाहीर केलेले नाही.

(हेही वाचा – Asaram Bapu : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आसाराम बापूंची शिक्षा माफीची याचिका )

…याचे उत्तर सरकारकडे उत्तर नाही
या मेळाव्यात एकूण ४०० कंपन्यांपैकी फक्त १८ कंपन्या पुणे जिल्ह्याबाहेरील होत्या. त्यामध्ये सोलापूरमधील एक, सांगलीतील एक आणि मुंबईच्या एका कंपनीचा समावेश आहे, जर पुणे जिल्ह्यात खरोखर एवढे रोजगार असतील, तर पुणे शहराला एवढ्या लोकसंख्येचा भार उचलता येणार आहे का? मर्यादित संसाधने असताना या लोकसंख्येला कसे सामावून घेतले जाणार आहे? याचे उत्तर सरकारकडे नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अनेक कंपन्या GST रजिस्टर्ड नाहीत…
या मेळाव्यात अनेक कंपन्या सहभागी झाल्याचे सांगण्यात येत होते, मात्र असे असले तरीही फक्त ९ कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटवर या मेळाव्याची जाहिरात केली आहे. त्यामुळे उर्वरित ३९१ कंपन्या GST रजिस्टर्ड नाहीत. कर्मचारी संख्या आताच १० ते १५ जणांची आहे. असे का? याचे उत्तर देण्यास एकही सरकारी अधिकारी तयार नाही, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

३६ हजार नोकऱ्या ट्रेनी स्वरुपाच्या
४५ हजार नोकऱ्यांपैकी ३६ हजार नोकऱ्या ट्रेनी स्वरुपाच्या आहेत. गमतीचा भाग म्हणजे बँका आणि NBFCमध्ये ट्रेनी भरती करताच येत नाही. महिलांना देण्यात येणाऱ्या रोजगारात २२ टक्के घट झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे, पण कोणत्याही कंपनीने एकूण नोकऱ्यांपैकी किती जागा महिलांसाठी, किती पुरुषांसाठी असा उल्लेख केलेला नाही, असे निरीक्षणही जितेंद्र आव्हाड यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

एकीकडे खासगी आस्थापनांमध्ये भरतीसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असतानाच सरकारी नोकऱ्यांचा अनुशेष भरण्याबद्दल सरकारमधील एकही मंत्री का बोलत नाही? हा मेळावा म्हणजे बेरोजगार युवकांची फक्त फसवणूक नाही, तर त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्टंटबाजी करून आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये लोकांची मती गुंग करण्याचा प्रयत्न असला, तरी आता जनता शहाणी झाली आहे. २ कोटी रोजगार, बस हुई महंगाई की मार…या सर्व भूलथापांना जनता भीक घालणार नाही, असेही जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ‘X’पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.