विज्ञान प्रसार व प्रचाराचे कार्य गेली चार दशके निरंतर चालू ठेवणाऱ्या बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या 2022-23 च्या डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार, 16 एप्रिल 2023 रोजी एस्.एन्.डी.टी. विद्यापिठाच्या पाटकर सभागृहात दोन सत्रांत संपन्न झाला. सकाळ सत्रात इ. 9 वीच्या तर दुपारच्या सत्रात इ. 6 वीच्या विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
सकाळ सत्रात अध्यक्ष म्हणून President STEAM Academy, Nuclear Scientist BARC डॉ. ए.पी. जयरामनव प्रमुख अतिथी म्हणून Assistant Professor VJTI डॉ. विनोद सुर्यवंशी आणि दुपारच्या सत्रात अध्यक्ष म्हणून Scientist BARC डॉ. सुधीर थत्ते व प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध लेखिका डॉ. नंदिनी देशमुख या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना पदक, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थ्यांना रु. 3000, रौप्य पदक प्राप्त विद्यार्थांना 2000 रु. तर ब्रॉंझ पदक प्राप्त विद्यार्थ्यांना 1000 रु.चे रोख पारितोषिक देण्यात आले. इ. 9 वीच्या 205 व इ. 6 वीच्या 194 बालवैज्ञानिकांना पदक, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. या दिमाखदार सोहळ्यासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक उपस्थित होते.
(हेही वाचा डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. रजनीश कामत यांची नियुक्ती)
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाचे प्रेरणास्त्रोत व श्रद्धास्थान असलेले सन्माननीय विश्वस्त, सल्लागार, ज्येष्ठ सदस्य आणि संपूर्ण विद्यमान कार्यकारिणी उपस्थित होती. या सोहळ्याचे औचित्य साधून विज्ञान क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणाऱ्या माधवी बर्जे व विजया आसबे या मंडळाच्या ज्येष्ठ विश्वस्तांना प्रतिष्ठेचा ‘जीवनगौरव’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दोन्ही सत्रांत प्रास्ताविक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष कैलास चव्हाण यांनी केले. 2022-23 या वर्षाच्या कार्य अहवालाचे वाचन सचिव गोविंद गुंजाळ यांनी केले. मंडळाच्या प्रस्तावित ‘विज्ञान व पर्यावरण शिक्षण आणि संवर्धन केंद्रा’ च्या उभारणीचा आढावा श्रीकांत शिनगारे यांनी घेतला. कोषाध्यक्ष अच्युतराव माने यांनी आभार प्रदर्शन केले. दोन्ही सत्रांतील कार्यक्रमांचे बहारदार, ओघवते सूत्र संचालन सुप्रसिद्ध RJ व अभिनेता प्रणय जयश्री कैलास चव्हाण यांनी केले.
Join Our WhatsApp Community