मुंबईत (Mumbai) मेट्रो मार्गिकांची (Metro line 2 B) कामे २०१८ पासून सुरू आहेत. त्यासाठी विविध भागांत खोदकाम आणि इतर कामे सुरु आहेत. त्याला बॅरिकेड्स लावलेले असल्याने रस्तेही अरुंद झाले आहेत. परिणामी शहराच्या मुख्य रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. येत्या काही महिन्यांत आता काही मेट्रो मार्गिकांची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. तेथील बॅरिकेड्स हटवले जात आहेत. मंडाले ते डीएन नगर मेट्रो २ बी, वडाळा ते कासारवडवली मेट्रो-४ यांच्या स्थानकांखालील व आगमन-निर्गमन मार्गासाठी असलेले बॅरिकेड्स डिसेंबर २०२५ पर्यंत काढणार असल्याची माहिती एमएमआरडीएच्या (MMRDA) अधिकाऱ्यांनी दिली आहे.
(हेही वाचा – Chhatrapati Sambhaji Maharaj कैद झालेल्या सरदेसाई वाड्याचे सरकार स्मारकात रुपांतर करणार)
‘मेट्रो-२ बी’च्या कामांची अशी आहे स्थिती
मेट्रो २ बी मार्गिकेचे काम ८८ टक्के कामे पूर्ण झाले आहे. ही मेट्रो न्यू लिंक रोड, गुलमोहर रोड, व्ही.एल. मेहता रोड, एस.व्ही.रोड, बीकेसी, एस.जी. बर्वे मार्ग व सायन-पनवेल हायवेमार्गे मानखुर्दला जाते. एस.व्ही. रोडवर (SV Road) मेट्रोची ५.६८ किमी लांबी असून विलेपार्ले ते वांद्रे पश्चिमेतील ४.५० किमी लांबीमधील बॅरिकेड्स काढले आहेत.
एस.व्ही. रोडवर वांद्रे स्थानकाजवळ वांद्रे मेट्रो स्थानक (Bandra Metro Station) प्रस्तावित आहे. या स्थानकाच्या १२ पैकी ११ पिलर्सचे कामे पूर्ण झाले आहे. या ठिकाणावरील बॅरिकेड्स हटविले आहेत. उर्वरित ठिकाणी एकत्र बॅरिकेड्स न लावता टप्प्याटप्प्याने बॅरिकेड्स उभारुन कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community