पांगरी फटाके फॅक्टरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. ज्या ठिकाणी स्फ़ोट झाला त्या ठिकाणी कारखान्याला कोणताही परवाना नव्हता. 2007 साली युसूफ मणियार यांना कारखाना सुरु करण्यासाठी परवानगी मिळाली होती. मात्र तो परवाना ज्या ठिकाणी दिला होता त्याला सोडून दुसरीकडे विनापरवाना त्यांनी दुसरा कारखाना सुरु केला होता. कोणत्याही निकषाचे पालन न करता पत्राच्या शेडमध्ये हा गोडाऊन आणि कारखाना त्यांनी सुरु केला होता. पोलिसांनी युसूफ मणियार याच्या विरोधात सदोष मनुष्य वधाचा भादंवी कलम 304, 337, 338, 285, 286, 34 हे गुन्हे दाखल केले आहेत.
मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल
जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 15 किलोपर्यंतच्या फटक्यासाठी परवाना दिला जातो, मात्र त्यापेक्षा जास्त जर दारू साठा असल्यास त्याची परवानगी ही पीईएसओ मार्फत दिली जाते. मात्र स्फ़ोट झालेल्या ठिकाणी नियमांपेक्षा जास्त दारू साठा असण्याची शक्यता आहे. हे तपासण्यासाठी प्रशासनातर्फे एक्सप्लोसिव एक्सपर्टची एक टीमदेखील बोलवण्यात आली असल्याची सूत्रांनी माहिती दिली. दरम्यान १ जानेवारी रोजी ज्या ठिकाणी स्फ़ोट झाले त्याचे परवाना तपासण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु आहे.
(हेही वाचा नवीन वर्षे चीनसाठी खडतर; आयएमएफने काय म्हटले?)