राजापूर तालुक्यातील बारसू barsu refinery project येथे प्रस्तावित रिफायनरीच्या विरोधात आंदोलकांनी मोर्चा काढण्याची तयारी करणारे खासदार विनायक राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. बारसूनजीक रानतळे येथे ही कारवाई करण्यात आली.
रिफायनरी विरोधात मोर्चा काढत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांकडून अटक….!#No_To_Barsu_Refinery pic.twitter.com/8j3BXK8qHK
— Ashish🎲 (@error040290) April 28, 2023
बारसू येथे रिफायनरी प्रकल्पासाठी barsu refinery project भू सर्वेक्षण सुरू आहे. या प्रकल्पाला काही स्थानिक ग्रामस्थांचा विरोध केला आहे. मंगळवारी काम सुरू होताना पहिल्या दिवशी झालेल्या रस्त्यावरील आंदोलनानंतर ग्रामस्थ केवळ ठिय्या आंदोलन करत होते. खासदार राऊत यांनी दिलेल्या भेटीनंतर आता या आंदोलनाने पुन्हा उचल घेतली आहे. यासाठी खासदार राऊत, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, जिल्हाप्रमुख विलास चाळके, तालुकाप्रमुख सदा सरवणकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रानतळे येथे एकत्र झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जमावबंदी आदेश मोडल्याच्या आरोपावरून रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम आणि त्यांचा मुलगा विनेश वालम या दोघांना पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा अटक केली आहे. या अटकेच्या कारवाईमुळे रिफायनरी विरोधकांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
(हेही वाचा Barsu Refinery : बारसू रिफायनरीवरून ठाकरे-पवारांमध्ये मतभेद? राजकीय चर्चांना उधाण! काय म्हणाले संजय राऊत?)
Join Our WhatsApp Community