एअर इंडियासह 7 विमान कंपन्यांना आता प्रवाशांच्या सामानाची डिलिव्हरी वेळेत करावी लागणार आहे. ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीने (BCAS) त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता विमान कंपन्यांना प्रवाशांच्या बॅग लँडिंग झाल्यानंतर 30 मिनिटांच्या आत प्रवाशांना द्याव्या लागणार आहेत. याची अंमलबजावणी करण्यासाठी 26 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. (BCAS Guidelines)
एअर इंडिया (Air India), इंडिगो, आकासा, स्पाइसजेट, विस्तारा, एअर इंडिया एक्सप्रेस कनेक्ट आणि एअर इंडिया एक्सप्रेस या हवाई वाहतूक कंपन्यांना आदेश जारी करण्यात आले आहेत.
(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीत राज्यातील २६ लाखांहून अधिक ज्येष्ठ नागरिक घेणार ‘ही’ सवलत)
ऑपरेशन, मॅनेजमेंट आणि डिलिव्हरी ॲग्रीमेंट (OMDA) नुसार, पहिली बॅग 10 मिनिटांच्या आत कन्व्हेयर बेल्टपर्यंत पोहोचली पाहिजे आणि फ्लाइट इंजिन बंद झाल्यानंतर 30 मिनिटांच्या आत शेवटची बॅग पोहोचली पाहिजे.
BCAS 6 विमानतळांवर देखरेख करत होते
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी याविषयी BCAS ला काही सूचना केल्या होत्या. त्यानंतर BCAS ने विमानाचे लॅंडिंग झाल्यानंतर प्रवाशांना बॅग देण्यास किती वेळ लागतो, यावर लक्ष ठेवले होते. 6 जानेवारीपासून BCAS ने ही कारवाई चालू केली होती.
BCAS ने एका निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांना त्यांचे सामान 30 मिनिटांत मिळाल्यास त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव असेल. सध्या सर्व विमान कंपन्यांवर पुढील काही दिवस लक्ष ठेवण्यात येणार आहे. ज्या कंपन्या प्रवाशांना त्यांचे साहित्य वेळेत उपलब्ध करून देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईही करण्यात येणार आहे. (BCAS Guidelines)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community