WPL 2023 : महिला आयपीएलचा पहिला हंगाम! ४६६९.९९ कोटींचे असे असतील ५ संघ

222

आता भारतात महिला इंडियन प्रिमियर लीग खेळवली जाणार आहे. IPL च्या धर्तीवर आता वुम्नस प्रिमियर लीग भारतात रंगणार आहे. BCCI चे अध्यक्ष जय शाह यांनी याबाबत माहिती दिली आहे. या लीगमध्ये एकूण ५ संघ असतील. यामध्ये अहमदाबाद, मुंबई, बंगलोर, दिल्ली आणि लखनौ या पाच संघाचा समावेश असले. या संघांचा लिलाव करण्यात आला असून यासाठी अनेक मोठ्या कंपन्यांनाही रस दाखवला होता. याबाबत BCCI ने ट्विट करत माहिती दिली आहे. अदानी ग्रुपने अहमदाबादचा संघ खरेदी केला आहे तर रॉयर चॅलेंजर्स बंगलोरने दुसरा महिला संघ विकत घेतला आहे.

( हेही वाचा : संतापजनक! पोलीस हवालदाराकडून गर्भवती महिलेला मारहाण)

वुमन्स प्रिमियर लीगमध्ये ५ संघांचा लिलाव करण्यात आला असून सर्वाधिक बोली अहमदाबादच्या संघासाठी लागली होती. अदानी स्पोर्ट्स लाइन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने अहमदाबाद संघाला १२८९ कोटी रुपयांत खरेदी केले. इंडिया विन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने मुंबई संघाला ९१२.९९ कोटी रुपयांमध्ये खरेदी केले तर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या संघाने महिला टिमसाठी ९०१ कोटी रुपये मोजले आहेत. वुमन्स लीगमधील पाचही संघाची एकूण किंमत ४६६९.९९ कोटी इतकी झाली आहे.

महिला IPL चे आयोजन ४ मार्च ते २६ मार्च या कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. यादरम्यान २२ सामने होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये या IPL साठी लिलाव करण्यात येईल.

महिला IPL संघ

    • अहमदाबाद – १२८९ कोटी – अदानी स्पोर्ट्सलाइन
    • मुंबई – ९१२.९९ कोटी – इंडिया विन स्पोट्सलाइन
    • बंगलोर – ९०१ कोटी- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
    • दिल्ली – ८१० कोटी – JSW GMR क्रिकेट
    • लखनौ – ७५७ कोटी – कॅपरी ग्लोबल होल्डिंग्स

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.