क्षय रोगाचे संपूर्ण उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाने आता कंबर कसली आहे. १८ वर्षांवरील नागरिकांनाही बीसीजीची लस देण्यात येणार आहे. यासाठी घरोघरी जाऊन २९ एप्रिलपासून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ही लस ऐच्छिक राहणार आहे. (BCG Vaccine)
क्षय रोगाची टक्केवारी रोखण्यासाठी बीसीजी लस ही १८ वर्षांवरील नागरिकांना देण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. या संदर्भात लवकरच जिल्ह्यात आशा सेविका, आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले आणार आहे. लसीकरणासंदर्भात पात्र लाभार्थ्यांकडून त्यांची यथोचित लेखी संमती घेऊन नंतर त्यांना लस दिली जाणार आहे. येत्या सोमवारपासून २९ एप्रिलपासून सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
(हेही वाचा – Uttarakhand Fire: उत्तराखंडमधील जंगलात लागलेल्या वणव्यांवर हवाई दलाने मिळवले नियंत्रण)
Join Our WhatsApp Community