QR Code स्कॅनद्वारे Transaction करताना आठवणीने करा ‘हे’ काम, नाहीतर होईल मोठी फसवणूक

हल्ली डिजिटल पेमेंटमुळे खिशात आणा नसतानाही आपल्याला बाजीरावाचा रुबाब मिरवता येतो. अगदी पानवाला,चहावाल्यापासून ते मोठ्या शॉपिंग मॉलपर्यंत सगळीकडे सर्रासपणे डिजिटल ट्रॅन्झॅक्शन केले जाते. क्यू-आर कोड स्कॅन करुन किंवा फोन नंबरच्या माध्यमातून पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जलदरित्या पेमेंट करता येते.

पण अनेकदा या डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार देखील मोठ्या प्रमाणात घडत असतात. ऑनलाईन फसवणुकीसाठी आता QR Code स्कॅनचा वापर स्कॅमर्सकडून करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे.

(हेही वाचाः Google Pay,Phone Pe व्यवहारांवर नियंत्रण येण्याची शक्यता, किती रुपयांपर्यंत करता येणार Transaction?)

अशी होत आहे फसवणूक

पेट्रोल पंप किंवा इतर दुकानांमध्ये QR Code स्कॅन करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी अनेकदा स्कॅमर्स दुकानदाराचे क्यू आर कोड बदलून आपले क्यू आर कोड लावतात आणि त्यामुळे व्यवहार करताना पैसे थेट स्कॅमर्सच्या बँक अकाऊंटमध्ये जातात. याबाबतची माहिती अनेकदा दुकानदारालाही मिळत नाही. त्यामुळे अशी फसवणूक टाळण्यासाठी काही दक्षता घेणे गरजेचे असल्याचे काही सिक्युरिटी रिसर्च फर्मकडून सांगण्यात येत आहे.

अशी टाळा फसवणूक

शक्यतो ऑनलाईन पैसे देताना दुकानदाराचा नंबर घेऊनच त्या नंबरवर ट्रॅन्झॅक्शन करा. जर आपण क्यू आर कोड स्कॅन करुन पैसे देणार असाल तर कोड स्कॅन केल्यानंतर आलेले नाव हे दुकानदाराला दाखवून कन्फर्म करुन घ्या. त्यामुळे अशा पद्धतीची फसवणूक होण्यापासून तुम्ही वाचू शकतात.

(हेही वाचाः ‘श्रद्धा वालकर हत्येसारखे प्रकार ‘या’ कारणामुळे घडतात’, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे स्पष्ट मत)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here