खबरदारी घ्या ! इंदूरमध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरियंट

116

कोरोनाचा धोका संपूर्णपणे टळला नसून, इंदूरमध्ये कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरियंटचे नवे स्वरुप ‘एवाय ४’ (AY4.2) आढळून आले आहे. हा नवा व्हेरियंट अधिक घातक आहे असे, तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. ब्रिटनमध्ये करोनाच्या या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले होते, यानंतर या नव्या व्हेरियंटचे परीक्षण आणि मूल्यांकन केले जात होते. आता याचे भारतातही रुग्ण आढळून आले आहेत.

इंदूरमधील वाढते संक्रमण

इंदूरमधील सात रुग्णांच्या नमुन्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंगअंती हे ‘एवाय ४’ नवे स्वरुप आढळले आहे. गेल्या काही महिन्यात, इंदूरमधील कोरोना ६४ टक्क्यांनी वाढला होता. नव्या व्हेरियंटची लागण झालेले इंदूरमधील सातही रुग्ण सुरक्षित आहेत.

(हेही वाचाः आरोग्य विभागाच्या परीक्षेचा सावळा गोंधळ थांबेना)

नवा व्हेरियंट अधिक घातक

एवाय ४ हा सब वेरियंट मूळ डेल्टापेक्षा १० ते १५ टक्के अधिक संसर्गजन्य असल्याचं नोंदवलं गेलं आहे. नॅशनल रोग नियंत्रण केंद्र (NCDC) यांना जाहीर केलेल्या अहवालानुसार, ‘एवाय ४’ या व्हेरियंटची संक्रमण क्षमता जुन्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक आहे. मात्र, सध्या तो मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता कमी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. यामुळेच सतर्कता बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे. या व्हेरियंटची भारतात १० पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. पण, ब्रिटनमध्ये या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत म्हणून, या व्हेरियंटला ‘इन्व्हेस्टिगेशन अंडर इन्व्हेस्टिगेशन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.