सोशल मीडियावर ‘हे’ शब्द वापरत असाल…तर सावधान! होऊ शकते कारवाई

133

सोशल मीडियावर कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह शब्द वापरल्यास कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणतेही शब्द वापरण्यापूर्वी काळजी घ्या असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारीच्या महिन्याभरात मुंबईत ३ हजार १८४ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी १ हजार ६७९ गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे. यामध्ये सायबर क्राइमचे ३२३ गुन्हे नोंद असून त्यापैकी अवघ्या २१ गुन्ह्यांची उकल करत ३२ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सोशल मीडियावर हे शब्द वापरताय?

  • जातीवाचक शब्दांचा सोशल मीडियावर वापर करू नये, असे शब्द वापरणे टाळावे.
  • आदेशानुसार कोणत्याही प्रकारे धर्म, भाषा, जात किंवा जनसमाज यांच्या किंवा अन्य कोणत्याही कारणावरून निरनिराळे धार्मिक, वंशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट अगर जाती जनसमाज यांच्यामध्ये तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेष भावना निर्माण होईल अशा आक्षेपार्ह पोस्ट किंवा अफवा, अनधिकृत माहिती समाज माध्यमाच्या माध्यमातून पसरवणारे व्यक्ती अथवा संस्था अथवा संघटना या कायद्यान्वये कायदेशीर व दंडनीय कारवाईस पात्र राहील.
  • व्हॉट्सअ‍ॅप समूहात अफवा, चुकीची माहिती किंवा दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल असा मजकूर, छायाचित्र किंवा ध्वनी चित्रफित पाठवू नये. खात्री नसलेले साहित्य व्हॉट्सअ‍ॅपवर पोस्ट करणे टाळावे.
  • व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या समाजाचे किंवा धर्माविरोधातील साहित्य, पॉर्न क्लिप्स पाठवू नये. ग्रुप अ‍ॅडमिनने अशा घडामोंडीवर लक्ष ठेवावे.

नियमांचे उल्लंघन केल्यास?

या नियमांचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहितेतील कलम १५३ अ आणि ब, २९५ अ, ५०५, १८८ माहिती कायद्यातील कलम ६६ क आणि ड, आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५४, मुंबई पोलीस कायद्यातील कलम ६८ आणि फौजदारी दंड संहितेतील कलम १४४ अन्वये गुन्हा नोंद केला जाईल असे सायबर महाराष्ट्राने स्पष्ट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.