गुगलमध्ये ‘हे’ सर्च कराल तर थेट जेलमध्ये जाल

अलिकडे कोणतीही गोष्ट माहित नसेल तर आपण थेट गुगल सर्चची मदत घेतो. माहित नसलेली ठिकाणे, जेवणाच्या रेसिपी, अभ्यासासंदर्भात अडलेले प्रश्न या सर्व गोष्टींची उत्तर आपल्याला गुगल सर्च केल्यावर लगेच मिळतात. इंटरनेच्या मदतीने गुगलवर कोणतीही माहिती मिळवणे अगदी सहज शक्य होते. परंतु आज आम्ही तुम्हाला कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करू नये याविषयी माहिती देणार आहोत. या गोष्टी तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला थेट जेलमध्येही जावे लागू शकते. याविषयी जाणून घेऊया…

( हेही वाचा : सोलो ट्रिपला जाताय? या गोष्टी नक्की लक्षात ठेवा! )

चाइल्ड पॉर्न सर्च करू नका

गुगलवर कधीही चाइल्ड पॉर्नशी संबंधित माहिती सर्च करू नका. पोक्सो कायदा २०१२ कलम १४ अंतर्गत चाइल्ड पॉर्न पाहणे, बनवणे आणि स्टोअर करणे कायदेशीर गुन्हा आहे. यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. गुगलवर चाइल्ड पॉर्न संबंधित कंटेंट सर्च केल्यास ५ ते ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते.

बॉम्ब बनवण्याची पद्धत

बॉम्ब कसा बनवायचा याबाबत कधीही गुगलवर सर्च करू नका. असे सर्च केल्यामुळे तुम्ही सुरक्षा एजेंसीच्या रडावर येता यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे गुगलवर कधीही बॉम्ब कसा बनवायचा हे सर्च करू नका.

गर्भपात संबंधित सर्च

गुगलवर गर्भपाताविषयी सर्च करणे टाळावे. भारतात वैद्यकीय सल्ल्याशिवाय गर्भपात करणे बेकायदेशीर आहे.

ऑफर्सची माहिती सर्च करू नका

गुगलवरील विविध ऑफर्सबाबत अनेकजण माहिती घेत असतात. परंतु या ऑफर्स अनेकदा बनावट असू शकतात. यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. यामुळे या गोष्टी कधीच गुगलवर सर्च करू नये.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here