दिवाळीत ऑनलाईन खरेदी करताना सावधान!… अन्यथा होऊ शकते तुमची फसवणूक

138

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दिवाळीत विविध ऑफर्स देतात. परंतु ऑनलाईन शॉपिंग करताना सावधनता बाळगणे गरजेचे आहे. याबाबत पोलिसांनीही जनजागृती सुरू केली आहे. सण-उत्सवानिमित्ताने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात वस्तू आणि कपडे खरेदी केले जातात. याचा फायदा घेत ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्या सक्रिय होत असतात. म्हणूनच दिवाळीत ऑनलाईन खरेदी करताना विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.

( हेही वाचा : वंदे भारत २.० या एक्स्प्रेसचे लोकार्पण! हिमाचल प्रदेश ते दिल्ली प्रवास होणार सुसाट)

दिवाळीत ऑनलाईन खरेदी करताना घ्या विशेष काळजी

  • एखादे संकेतस्थळ (online shopping website) सुरक्षित आहे की नाही ते तपासून घ्या. यासाठी संकेतस्थळामध्ये एचटीटीपीएस ही अक्षरे, कुलुपाचे चिन्ह असणे आवश्यक आहे.
  • सणासुदीच्या काळात वस्तू घरी आल्यानंतरच पैसे द्या. अर्थात वस्तू खरेदी करताना Cash On Delivery हा पर्याय निवडा यामुळे तुम्ही घरी पार्सल घेतल्यानंतर खात्री करून पेमेंट करू शकता.
  • कोणत्याही सार्वजनिक संगणकावरून किंवा सार्वजनिक वायफायचा access घेत वस्तू ऑर्डर करू नका.
  • दिवाळीत किंवा ऑफर्स कालावधीमध्ये अमूक एका कंपनीचे तुम्ही गिफ्ट कार्ड जिंकले आहे असे अनेक मेसेज येतात अशा फसव्या मेसेजला बळी पडू नका.
  • शक्यतो प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करा यामुळे तुमची आर्थिक फसवणून होणार आहे.
  • बऱ्याच वेळा अनेक ऑनलाईन ऑर्डर असल्यामुळे तुम्हाला निश्चितवेळी वस्तूची डिलिव्हरी मिळणार नाही अशावेळी प्रत्यक्ष जाऊन ऑफलाईन खरेदी करणे सोयीचे ठरते.
  • पोलिसांनी सुद्धा नागरिकांनी सुरक्षेची संपूर्ण खात्री करूनच ऑनलाईन खरेदी करावी व सावधानता बाळगावी असे आवाहन नागरिकांना केले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.