रेल्वेने प्रवास करताना आपला सोबतचा प्रवासी अथवा आपले सामान खाली राहिले म्हणून जर कुणी साखळी ओढून रेल्वे थांबविली, तर त्यास अटक केली जात आहे. पुणे स्थानकांवर गेल्या काही दिवसांत अशा घटनांत वाढ झाली आहे.
वर्षभरात ९०२ वेळा साखळी ओढल्याचे प्रकार
मागील वर्षभरात एकट्या पुणे स्थानकावर एसीपी (अलार्म चेन पुलिंग) च्या ९२९ घटना घडल्या असून, यात ८०३ प्रवाशांना आरपीएफकडून अटक झाली आहे. केवळ आपत्कालीन परिस्थितीत चेन ओढली तर रेल्वे प्रशासन कारवाई करीत नाही. आपत्कालीन परिस्थितीत रेल्वे थांबविण्यासाठी प्रत्येक डब्यांत साखळी लटकविलेली असते. प्रवाशांनी ती ओढल्यावर काही सेकंदातच रेल्वे थांबते; मात्र गेल्या वर्षभरात तब्ब्ल ९०२ वेळा साखळी ओढून रेल्वे थांबविण्यात आली.
(हेही वाचा – आत्महत्या करण्यासाठी टेकडीवर गेलेल्या वकिलाला वाचवलं )
…तर होणार अटकेची कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये प्रवाशांनी दिलेले कारण रेल्वेला अमान्य झाल्याने त्यांनी संबंधित प्रवाशाला गाडीतून ताब्यात घेऊन त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. तसेच त्यांच्याकडून जवळपास १ लाख ४१ हजार रुपयांचा दंड देखील वसूल केला आहे.
Join Our WhatsApp Community