Cyber Fraud चा नवा फंडा! तुम्हाला पण आलेत का ‘हे’ 5 SMS? … तर सावधान

107

सध्याचे युग हे डिजिटल युग असल्याने सर्वच जण ऑनलाईन पद्धतीने व्यवहार करत आहे. त्यामुळे सायबर फ्रॉडची भिती देखील वाढली आहे. सायबर फ्रॉडच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना हॅकर्स वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवणुकीचे बळी ठरवतात. यामध्ये तुमचे बँक खाते एका चुकीने रिकामं होण्याचा धोका सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत अशा फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे आहे. स्कॅमर्स फ्रॉड करण्यासाठी अनेक पद्धतींचा वापर करत असतात. कधी वीज कपातीच्या नावाने तर कधी नोकऱ्या मिळवून देण्याच्या आमिषाने लोकांना मेसेज केले जाते. या मेसेजसोबत एक लिंकही शेअर केली आहे. लिंकवर क्लिक करून तुमचे बरेच तपशील त्यांना मिळतील.

(हेही वाचा – ‘रावण’ म्हणून टीका करणा-या खरगेंना पंतप्रधान मोदींनी दिले उत्तर, म्हणाले…)

1. नोकरी देण्याच्या नावाखाली फसवणूक

युजरला त्याचा नोकरीचा अर्ज मंजूर झाले असून युजरला मोठं वेतन देखील सांगितले जाते. नंतर शेवटी एक लिंक दिली जाते आणि त्यावर क्लिक करण्यास सांगितले जाते. ही व्हॉट्सअॅप चॅटची लिंक आहे. यामध्ये तुमचे चॅट हे स्कॅमरसह ओपन होते, त्यानंतर तुमच्याकडून तुमची वैयक्तिक माहिती मिळवून फसवणूक केली जाते.

2. बँक खाते ब्लॉक करण्याच्या नावाखाली फसवणूक

युजर्सना बँक खाते किंवा कार्ड ब्लॉक झाले आहे, सांगितले जाते. अशा मेसेजमध्ये कधी एसबीआय योनो चा उल्लेख असतो. तर कधी एचडीएफसी नेटबँकिंग ब्लॉक केल्याचे सांगितले जाते. बँकेशी संबंधित असल्याने युजर्स जास्त घाबरतात. पण अशा फिशिंग लिंकवर चुकूनही क्लिक करू नका.

3. वीज तोडण्याच्या नावाखाली फसवणूक

वीज कपातीचा मेसेज हा देखील एक सामान्य फसवणूक आहे. यामध्ये युजर्सना असे सांगितले जाते की, त्यांच्या घराची वीज कापली जाणार आहे. हे टाळण्यासाठी त्यांना एका नंबरवर कॉल करण्यास सांगितले जाते. हा नंबर स्कॅमरचा असतो, यातून स्कॅमरला तुमच्याकडून सर्व वैयक्तिक माहिती मिळते. याचा वापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी केला जातो.

4. कर्ज मंजुरीचा मेसेज

कर्ज देण्याच्या नावाखाली युजरसोबत फसवणूकही केली जाते. युजरला मेसेज पाठवला जातो की, त्याचे कर्ज प्री अप्रूव्ह झाले आहे. अशी कर्जे मंजूर केली जातात ज्यासाठी तुम्ही कधीही अर्ज केला नाही. यानंतर तुम्हाला एका लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. त्यावरही तुमच्याकडून वैयक्तिक माहिती घेऊन फसवणूक केली जाते.

5. कस्टम विभागाच्या नावाखाली फसवणूक

हा स्कॅमचा नवा प्रकार आहे. यामध्ये युजरला एक मेसेज पाठवला जातो की, त्यांचं महागडी भेट वस्तू कस्टम विभागाकडे जमा आहे. ते मिळविण्यासाठी, तुम्हाला कस्टम ड्युटी भरण्यास सांगितले जाते. कस्टम ड्युटीच्या नावाखाली ही फसवणूक होते.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.