Beach Cleaning : वर्सोवा आणि वर्सोवा विस्तार चौपाटीच्या स्वच्छतेसाठी पावसाळ्यात प्रतिदिन नेहमीपेक्षा ६० ते ६५ टक्के वाढतो खर्च

108
Beach Cleaning : वर्सोवा आणि वर्सोवा विस्तार चौपाटीच्या स्वच्छतेसाठी पावसाळ्यात प्रतिदिन नेहमीपेक्षा ६० ते ६५ टक्के वाढतो खर्च
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईतील अंधेरी वर्सोवा आणि वर्सोवा विस्तार येथील सागरी किनाऱ्यांच्या साफसफाईसाठी आता महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दिवसाला ९४ हजारांचा खर्च केला जाणार असून पावसाळ्यात हा खर्च यापेक्षा ६० ते ६५ टक्क्यांनी वाढला जात आहे. पावसाळ्यात मात्र या चौपाटीच्या साफसफाईसाठी तब्बल १ लाख ४६ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे ही साफसफाई टॅक्टरसहित यंत्राचा वापर केला जाणार आहे.

मुंबईमध्ये गिरगाव, दादर, चिंबई, जुहू, वेसावे (वर्सोवा), मढ आणि गोराई आदी प्रमुख सात चौपाट्या असून यासर्व चौपाट्यांची एकूण लांबी ही ३६.५ किलोमीटर एवढी असून देशविदेशातील पर्यटक याठिकाणी भेट देण्यास येत असल्याने महापालिकेच्यावतीने येथील स्वच्छता राखली जाते. चौपाट्या स्वच्छता करण्यासाठी विशेष यंत्रे जोडलेले टॅक्टर, कॉम्पॅक्टर, टॅक्टर ट्रॉली, २४० लिटर क्षमतेचे कचऱ्याचे डबे उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशाचप्रकारे वर्सोवा आणि वर्सोवा विस्तार येथील साफसफाई करण्यासाठी यापूर्वी जुलै २०१८ मध्ये नियुक्त केलेल्या कंपनीचे कंत्राट जुलै २०२४ रोजी संपुष्टात आले. वर्सोवा आणि वर्सोवा चौपाटीची रुंदी ६० मीटर असून लांबी ४५०० मीटर एवढी आहे. (Beach Cleaning)

(हेही वाचा – Bhagoji Keer, Nana Shankarsheth Memorial सह मुंबईतील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पणांचा महायुतीचा धमाका)

मात्र, हे कंत्राट संपण्यापूर्वी निविदा मागवणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात याची निविदा संपुष्टात आल्यानंतर सहा वर्षांच्या कालावधीकरता निविदा मागवण्यात आली आहे. त्यानंतर याच्या निविदा २१ ऑगस्ट रोजी उघडण्यात आल्या. यात कोस्टल क्लीन एनविरो यांच्या संयुक्त भागीदारातील एशियन ट्रेडर्स, जय मल्हार हायरिंग सर्विसेस आणि एमआय ट्रेडींग अँड जनरल सप्लायर्स ही कंपन्या पात्र ठरल्या. यापूर्वी या चौपाटीच्या स्वच्छतेसाठी स्प्रेक्ट्रॉन इंजिनिअर्स या कंपनीची नियुक्त केले होते, ही कंपनी यावेळच्या निविदेत पात्र ठरली नाही. ट्रॅक्टरसहित बीच साफसफाई यंत्राची खरेदी केली आहे. हे यंत्र ९४ लाखाला खरेदी केले जाणार आहे.

वर्सोवा आणि वर्सोवा विस्तार चौपाटीच्या स्वच्छतेसाठी टॅक्टरसहित बीच साफसफाई मशिन, ४ कचरा दाबयंत्र, २ टॅक्टर ट्रॉली, १ स्किड स्टिअर लोडर तसेच सौर उर्जेने परावर्तीत होणारी झाकणे असलेले २४० लिटर क्षमतेचे कमीत कमी २३ व्हिलबिन्स कंत्राटदार उपलब्ध करून देणार आहे. तसेच पावसाळ्या व्यतिरिक्त कमीत कमी ६० कामगार, आणि पावसाळ्यात कमीत कमी १२० कामगार तैनात केले जाणार आहेत. सहा वर्षांसाठी या साफसफाईसाठी तब्बल ५१ कोटी रुपये खर्च होणार आहे. त्यामुळे प्रतिदिन या चौपाटीच्या साफसफाईसाठी ९४ हजार २४६ रुपये खर्च होणार असून पावसाळ्यात हा खर्च १ लाख ४२ हजार ३३ रुपये खर्च होणार आहे. (Beach Cleaning)

(हेही वाचा – Ahmednagar शहर आता अहिल्यानगर म्हणून ओळखले जाणार)

महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार पावसाळ्यात चौपाटीवर अधिक कचरा होत असल्याने तसेच समुद्रातील कचरा अधिक प्रमाणात मोठ्या लाटांमुळे चौपाट्यावर येत असल्याने याची सफाई पावसाळ्यात अधिक करावी लागते तसेच अधिक मनुष्यबळावा वापर अधिक करावा लागतो असे त्यांचे म्हणणे आहे. (Beach Cleaning)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.