मुंबई सुशोभिकरण अभियानाद्वारे महापालिकेच्या आर मध्य विभाग अर्थात बोरीवली परिसराच्या सौंदर्यीकरणाची कामे हाती घेतली जात आहे. यामध्ये बोरीवलीतील बारा वाहतूक बेटांसह ९ भिंतींच्या रंगरंगोटीची कामे केली जाणार आहेत. यासाठी पावणे पाच कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबईचे सौंदर्य वाढविण्यासाठी व प्रदर्शनीय करण्यासाठी बोरीवलीतील महापालिकेच्या आर/मध्य विभागातील विविध ठिकाणावरील वाहतूक बेटे/रोड जंक्शन, पूल आणि मूलाखालील क्षेत्राचा वापर आणि विविध ठिकाणी भिंतीचे रंगकाम इत्यादी कामे हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये विशेषत: वाहतूक बेटांचे सौंदर्यीकरण तसेच भिंतींचे सुशोभिकरणासाठी विविध करांसह ४ कोटी ७९ लाख लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे. या वाहतूक बेटांसह भिंतीच्या रंगरंगोटीच्या कामासाठी सहयोग कंपनीची निवड करण्यात आली आहे.
(हेही वाचा सरकारला मदत करणाऱ्या आयपीएस, आयएएस अधिकाऱ्यांना आदित्य ठाकरेंची धमकी)
वाहतूक बेट, रोड जंक्शन सौंदर्यीकरण
- बोरीवली (प.), गोराई बेट्टी रोडवर बेड हॉटेलसमोरील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), गौराई रोड, गोराई देवीसमोरील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), गोराई किनान्या समोरील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), आकाशवाणी समोरील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), गोराई बस डेपो समोरील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), गोराई जेट्टी रोड, गंगोत्री इमारती समोरील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), कार्टर रोड क. २ येथील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), एस. व्ही. रोड, श्मामाप्रसाद मुखर्जी चौक येथील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), शिंपोली रोड, सरदार वल्लभभाई पटेल चौक येथील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), देवीदास रोड आणि मंडपेश्वर रोड येथील वाहतूक बेट
- बोरीवली (प.), एस. व्ही. पी. रोड, आणि गांजावाला रोड येथील वाहतूक बेट
भिंतींची रंगरंगोटी
- बोरीवली महावीर नगर, एम.सी.ए. मैदान येथील भिंतींचे रंगकाम
- चिकूवाडी, म्हाडा मैदान येथील मितीचे रंगकाम
- चिकूवाडी महानगरपालिका शाळा येथील भिंतीचे रंगकाम
- महावीर नगर, महानगरपालिका टनेल कार्यालय येथील भिंतींचे रंगकाम
- बोरीवली (प.) चारकोप महानगरपालिका चौक येथील भिंतीचे रंगकाम
- बोरीवली (प.), शिंपोली, चिंतामणी उद्यान येथील भिंतीचे रंगकाम
- बोरीवली (प.), लिंक रोड, योगीनगर, महानगरपालिका लायसन्स कार्यालय येथील भिंतीचे रंगकाम
- बोरीवली (प.). बाभई महानगरपालिका शाळा येथील भितींचे रंगकाम
- बोरीवली (प.), गोराई बस डेपो येथील भिंतींचे रंगकाम