BMC : काळा घोडा परिसराचे बसाल्ट स्टोनसह हेरिटेज दिव्यांद्वारे होणार सुशोभिकरण

महापालिका अस्तित्वात नसल्याने नगरसेवकाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नसल्याने स्थानिक आमदार म्हणून ऍड राहुल नार्वेकर यांनी या कामाची शिफारस केल्याचे बोलले जात आहे.

159

मुंबईतील कुलाब्यामधील काळा घोडा आर्ट एव्हेन्यू  परिसराचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून हेरिटेज परिसरातील सर्व मार्गावर बसाल्ट स्टोन बसवले जाणार आहे.याशिवाय बसाल्ट स्टोन बसवलेल्या मार्गिकांवर हेरिटेज दिवे बसवले जाणार आहेत. यासाठी पावणे सहा कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.

काळा घोडा आर्ट एव्हेन्यू या भागाचे सौदर्यीकरण तसेच विद्युत रोषणाई करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष ऍड राहुल नार्वेकर यांनी केल्यानंतर महापालिकेच्या नियोजन विभागाच्यामाध्यमातून महापालिकेच्या निधीतून हे काम हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार आरखडा बनवण्यात आला असून काळा घोडा येथील अंतर्गत मार्गावर बसाल्ट स्टोन बसवण्यात येणार आहे, आणि या स्टोन बसवलेल्या मार्गिकांवर हेरिटेज दिवे लावले जाणार आहे. तसेच नव्याने तयार केलेल्या मार्गावर कलाकृती सदृश्य फलक लावले जाणार आहेत. आयुक्तांच्या मंजुरीने हाती घेतलेल्या या कामासाठी सी ई इन्फ्रा (इंडिया) याकंपनीची निवड करण्यात आली आहे. पुढील सहा महिन्यांमध्ये हे काम पूर्ण केले जाणार आहे.

महापालिका अस्तित्वात नसल्याने नगरसेवकाचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप होत नसल्याने स्थानिक आमदार म्हणून ऍड राहुल नार्वेकर यांनी या कामाची शिफारस केल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सुशोभिकरणाची काम यापूर्वीच उपनगराचे पालकमंत्री  आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून स्थानिक विभागाच्यावतीने राबवले जात होते. परंतु आता आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणे ऍड राहुल नार्वेकर यांनी हा या परिसराकडे विशेष लक्ष घालून या परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी विविध प्रकारच्या संकल्पना महापालिकेकडे मांडल्या असल्याचेही बोलले जात आहे.

(हेही वाचा Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्ग जरी वेगवान असला, तरी…’ उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला सल्ला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.