- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महापालिकेच्या मिलन सब वे जवळील मैदानाचे सुशोभिकरण करण्यात येत असून या मैदानावरील सॉकर मैदान आणि बेस बॉल मैदानाची दुरुस्ती करणे तसेच नव्याने क्रिकेटची खेळपट्टी आदी प्रकारची विविध कामे करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या ‘के/पश्चिम विभागातील विले पार्ले येथील मिलन सबवे जवळील एफ. पी. नं. ३४ आणि ३५ मधील नगर भू क्रमांक १५८२ मैदानाचे सुशोभिकरण करण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान कक्षामार्फत घेण्यात आला आहे. (Milan Subway Ground Beautification)
(हेही वाचा – तपासात दिरंगाई होत असल्याचे कारण देत Bombay High Court ने पानसरे हत्याकांडातील सहा आरोपींना दिला जामीन )
या उद्यानातील विविध बांधकामे आणि यांत्रिक व विद्युत कामे करण्यात येत असून यासाठी महापालिकेच्यावतीने सुमारे आठ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये सिव्हिल कामांसाठी साडेसहा कोटी रुपये आणि यांत्रिक व विद्युत कामांसाठी सुमारे ९६ लाख रुपये तसेच उद्यान विषयक कामांसाठी सुमारे ३९ लाख रुपये खर्च केले जाणार आहे. या कामांसाठी रिओना एंटरप्रायझेस कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी विविध करांसह ७ कोटी ८४ लाख रुपये रुपये खर्च केले जाणार आहे. महापालिकेच्या अंदाजित दरापेक्षा उणे २९ टक्के कमी दराने या कंपनीने बोली लावून हे काम मिळवले आहे. (Milan Subway Ground Beautification)
(हेही वाचा – UPI User: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, १ तारखेपासून होणार ‘हे’ बदल, जाणून घ्या)
मैदानाच्या सुशोभीकरणात केली जाणारी कामे :
- दोन प्रवेशद्वार तसेच सुरक्षा चौकीचे बांधकाम
- संरक्षक भिंतीची दुरूस्ती
- मुख्य प्रवेश द्वार उभारणे
- बैठक व्यवस्था
- फेरारी छतासह गॅलरी उभारणे
- पदपथाची निर्मिती
- क्रिकेटची खेळपट्टी बनविणे
- गजीबो बांधणे
- व्यायामाची साधणे बसविणे
- बेसबॉल मैदानाची दुरूस्ती
- स्वच्छतागृहाची दुरूस्ती
- खेळाची साधणे बसविणे
- अस्तित्वात असलेल्या इमारतीची दुरूस्ती
- सॉकर मैदानाची दुरूस्ती
- नाल्याच्या संरक्षक भितीवर ग्रील बसविणे
- पर्जन्यजल वाहीनीची दुरूस्ती
- विद्युतीकरणाची कामे
- तसेच हिरवळीची कामे (Milan Subway Ground Beautification)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community