Beautification : मालाडमधील विजय हुतात्मा साळसकर आणि कांदिवली पोईसरमधील मैदानांचे सुशोभीकरण

56
Beautification : मालाडमधील विजय हुतात्मा साळसकर आणि कांदिवली पोईसरमधील मैदानांचे सुशोभीकरण
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मालाड पूर्व येथील हुतात्मा विजय साळसकर उद्यानाचे तसेच कांदिवली येथील पोयसर गावातील मैदानाचे सुशोभीकरण (Beautification) करण्यात येणार असून या उद्यान आणि मैदानांच्या सुशोभीकरण केले जाणा आहे. या दोन्ही उद्यान आणि मैदानाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल सव्वा नऊ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे.

हुतात्मा विजय साळसकर उद्यान आणि कांदिवली पोयसर गावातील मैदानाचे सुशोभीकरण करण्यासाठी निविदा मागवून पात्र कंत्राटदाराची निवड केली आहे. यासाठी एस. बी. एंटरप्रायझेस कंपनीची निवड करण्यात आली असून या कंपनीने अंदाजित खर्चापेक्षा उणे २८ टक्के दराने बोली लावत पात्र ठरली आहे. उद्यान कक्षाच्यावतीने हे काम हाती घेण्यात येत आहे. यासाठी विविध करांसह ११.२१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या उद्यान आणि मैदानाच्या सुशोभीकरणाच्या (Beautification) कामांमध्ये सिव्हील कामांसाठी साडे नऊ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे, तर यांत्रिक व विद्युत कामांसाठी सुमारे ८४ लाख रुपये आणि उद्यान कामांसाठी सुमारे ८१ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

(हेही वाचा – Rohingya Muslims : दादरमधील रोहिंग्याविरोधातील आंदोलन क्षमले का?)

हुतात्मा विजय साळसकर उद्यानाचे असे होणार काम :

मुख्य प्रवेशद्वाराची दुरुस्ती, नवीन सुरक्षा चौकी बांधणे, संरक्षक भिंतीची दुरुस्ती व रंगरंगोटी करणे, अस्तित्वात असलेल्या पायऱ्यांची दुरुस्ती, पदपथाची दुरुस्ती, खेळाची साधनांची दुरुस्ती, स्वच्छतागृहाची दुरूस्ती करणे, बैठक व्यवस्थेची सोय, गजेबोचे बांधकाम, व्यायाम साधनांची दुरुस्ती, विद्युतीकरणाची कामे तसेच हिरवळीची कामे.

(हेही वाचा – Delhi Assembly Election : काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच स्वीकारला पराभव; ‘हे’ नेते प्रचारातून गायब)

कांदिवली (पूर्व) पोईसर गांव मैदानाची दर्जोन्नती व सुशोभीकरण : 

मुख्य प्रवेशद्वाराची दुरुस्ती, नवीन सुरक्षा चौकीचे बांधकाम, संरक्षक भिंतीची दुरुस्ती, रंगरंगोटी, अस्तित्वात असलेल्या पायऱ्यांची दुरूस्ती, पदपथाची दुरुस्ती, खेळाची साधने बसविणे, स्वच्छतागृहाची दुरुस्ती, बैठक व्यवस्थेची सोय, गजेबोचे बांधकाम, व्यायाम साधनांची दुरुस्ती, विद्युतीकरणाची कामे तसेच हिरवळीची कामे. (Beautification)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.