महालक्ष्मी स्थानक परिसरातील सात रस्ता चौकामध्ये असलेल्या संत गाडगे महाराज उद्यान असून या उद्यानाच्या सौंदर्यीकरणाचे काम महापालिकेच्यावतीने हाती घेण्यात येत आहे. हे उद्यान सध्या झुडपाच्या स्वरुपात आणि बकाल स्थितीत आहे. त्यामुळे या उद्यानाच्या सौंदर्यात भर घालण्याच्या दृष्टीकोनातून आता कामे केली जाणार आहेत.
महालक्ष्मी स्थानक परिसरातील अत्यंत रहदारीच्या व मुंबई शहराच्या मधोमध वसलेल्या परिसरातील सात रस्ता चौक हे एक महत्वाचे ठिकाण आहे. हे ठिकाणच पुरातन वारसा असलेले महालक्ष्मी धोबीघाट, महालक्ष्मी रेसकोर्स, वीर माता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय, भायखळा स्थानक, चिंचपोकळी स्थानक, आर्थर रोड मध्यवर्ती कारागृह, मुंबई सेंट्रल स्थानक इत्यादी मुंबईतील महत्वाच्या ठिकाणांजवळ असलेले हे ठिकाण आहे.
(हेही वाचा : यापुढे सेट कुणाला त्रास दिल्यास हातपाय मोडू! राजू सापते आत्महत्येनंतर मनसे आक्रमक)
सुमारे ६७ लाख रुपयांचे काम केले जाणार आहे!
तसेच याठिकाणी सात रस्ते येवून मिळत असल्याने पूर्वीपासूनच या ठिकाणाचे नाव सात रस्ता असे पडले आहे. या सात रस्ता चौकाच्या मध्यभागी वैशिष्ट्यपूर्ण अशी संत श्री गाडगे महाराज यांची मूर्ती स्थापित असून त्याभोवती असलेल्या उद्यानालाही संत गाडगे महाराज असे नाव देण्यात आले आहे. या उद्यानाच्या सौंदर्यीकरण व सुधारणा करण्यासाठी रचना संसदच्या माध्यमातून आराखडे तयार करण्यात आले असून त्यानुसार या कामासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. यामध्ये पार्श्वनाथ काँक्रीट ही कंपनी पात्र ठरली असून त्यानुसार जी दक्षिण विभागाच्यावतीने सुमारे ६७ लाख रुपयांचे काम केले जाणार आहे.
Join Our WhatsApp Community