Nashik News : हॉस्पिटलमध्ये मधमाशांचा हल्ला ; सहा जण जखमी

Nashik News : हॉस्पिटलमध्ये मधमाशांचा हल्ला ; सहा जण जखमी

77
Nashik News : हॉस्पिटलमध्ये मधमाशांचा हल्ला ; सहा जण जखमी
Nashik News : हॉस्पिटलमध्ये मधमाशांचा हल्ला ; सहा जण जखमी

सह्याद्री हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घडली. हॉस्पिटलच्या परिसरात अचानक मधमाशांचा हल्ला झाला, ज्यामुळे नातेवाइकांसह रुग्णांची मोठी धावपळ उडाली. या हल्ल्यात पाच ते सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींमध्ये रुग्णांचे नातेवाईक आणि हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले काही रुग्ण यांचा समावेश आहे. (Nashik News)

हेही वाचा-Nepal मध्ये हिंसक निदर्शने ! 105 निदर्शकांना अटक, सीमेवर हाय अलर्ट

मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात काही रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णांना भेटण्यासाठी तर काही रुग्ण तपासणीसाठी रुग्णालयात ये-जा करत होते. त्याचवेळी एक मोठा मधमाशांचा समूह अचानक परिसरात आढळला आणि तेथील लोकांवर हल्ला करायला लागला. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये काही वेळासाठी पळापळ सुरू होती. (Nashik News)

हेही वाचा- Kunal Kamra च्या विरोधात 3 नवीन गुन्हे दाखल !

अचानक केलेल्या मधमाशांच्या हल्ल्यात अनेक लोक गंभीरपणे जखमी झाले असून, त्यांना त्वरित उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉस्पिटल प्रशासनाने तातडीने आपत्कालीन सेवा सुरू करत जखमींवर उपचार केले. तसेच, स्थानिक अग्निशमन विभाग आणि पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली असून, मधमाशांची झुंड हटवण्यासाठी काम सुरू केले. (Nashik News)

हेही वाचा- Halonix : सीएफएल बल्ब बनवणाऱ्या हॅलोनिक्स कंपनीचे मालक नेमके कोण आहेत?

सह्याद्री हॉस्पिटलच्या वतीने एका निवेदनाद्वारे सांगण्यात आले की, ते या घटनेची गंभीर दखल घेत असून, जखमींवर योग्य उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच, हॉस्पिटल परिसरात आता मधमाशांचा त्रास नाही असे सांगण्यात आले. या घटनेमुळे गोंधळ उडाला होता. (Nashik News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.