Maratha Reservation : बीड मध्ये मराठा तरुणाची आत्महत्या

मागील चार दिवसांमध्ये दोन तरुणांनी आयुष्य संपवलं. या घटनेने बीडमध्ये हळहळ व्यक्त होतेय.

140
Maratha Reservation : बीड मध्ये मराठा तरुणाची आत्महत्या
Maratha Reservation : बीड मध्ये मराठा तरुणाची आत्महत्या

आरक्षणासाठी मराठा समाजाचे तरुण सध्या टोकाचं पाऊल घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. आत्महत्येचं सत्र काही केल्या थांबत नसल्याचं चित्र सध्या राज्यात पाहायला मिळतंय. दसऱ्याच्या दिवशी बीडमधील एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यातील शहाजानपूर तालुक्यामध्ये एका २३ वर्षाच्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी गळफास घेऊन त्याचं आयुष्य संपवलं. शरद मते असं या तरुणाचं नाव आहे. आयुष्य संपवण्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावं असा एक मजकूर त्याने चिठ्ठीमध्ये लिहून ठेवला होता. दरम्यान मागील चार दिवसांमध्ये दोन तरुणांनी आयुष्य संपवलं. या घटनेने बीडमध्ये हळहळ व्यक्त होतेय. (Maratha Reservation)

शरदने त्याच्या घरामागील शेतात जाऊन गळफास घेतला. मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या राज्यात जोर धरत आहे. त्यातच अनेक तरुण या मुद्द्यासाठी आयुष्य संपवत असल्याच्या घटना समोर येतायत. त्यामुळे राज्य सरकारने या प्रश्नावर गांभीर्याने विचार करण्याची गरज निर्माण झाल्याचं म्हटलं जातय. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील तरुणांना आत्महत्या न करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी देखील या तरुणांनी टोकाचं पाऊल उचलू नये असं आवाहन केले आहे.

(हेही वाचा : Maratha Reservation : गिरीश महाजन यांचा मनोज जरांगे यांना फोन; काय म्हणाले मनोज जरांगे)

बीडमध्ये याआधीही तरुणाने संपवलं आयुष्य
शुक्रवार (२०ऑक्टोबर) रोजी या तरुणाने झाडावर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी देखील त्याने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला. दुसऱ्या दिवशी मात्र या तरुणाने त्याचं आयुष्य संपवलच. जगन्नाथ पांडुरंग काळकुटे असं या तरुणाचं नाव आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजल्याचं पाहायला मिळालं.

बलिदान वाया जाऊ देणार नाही – मनोज जरांगे
दरम्यान मनोज जरांगे यांनी या तरुणांचं बलिदान वाया जाऊ न देण्याचा निर्धार केलाय. तसेच त्यांनी सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेईन असा निर्धार त्यांनी धनगर समाजाच्या मेळाव्यात केलाय. मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेलं अल्टिमेटम संपलं असून त्यांनी आमरण उपोषणाची हाक दिली आहे.

हेही पहा  –

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.