मांजरा नदीवर पूल नसल्यामुळे शेतकरी, शाळकरी मुलांचे हाल

उस्मानाबाद आणि बीड जिल्हा सीमेच्या मध्यातून जाणा-या मांजरा नदीवर पूल नसल्यामुळे येथील शेतक-यांना नदीपलीकडे आपल्या शेतात जाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. तसेच, विद्यार्थ्यांनाही शाळेत जात येत नाही, त्याने विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होते.

हिंगणी खुर्द गावाशेजारून मांजरा नदी गेली आहे. ही नदी उस्मानाबाद आणि बीड जिल्हा सीमेच्या मध्यातून गेली आहे. दरवर्षी पावसाळा सुरु झाल्यानंतर शेतकऱ्यांना तीन ते चार महिने शेतात जाता येत नाही व शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना हिंगणी खुर्दमधील मांजरा नदीवर पूल नसल्यामुळे 15 किलोमीटर अंतर पार करावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.

मुलांना शाळेत जाता येत नाही 

मांजरा नदीच्या पलीकडे मुंडे वस्ती आणि आंधळे वस्ती या दोन वस्त्या असून येथील सर्व नागरिकांना दैनंदिन कामकाज, मुलांचे शिक्षण, आदी मुलभूत गरजांसाठी हिंगणी खुर्द येथे यावे लागते. त्यामुळे वस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना जीवघेणा प्रवास नदीतून करावा लागतो. हा पूल नसल्यामुळे मुंडे वस्ती आणि आंधळे वस्ती इथे राहणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना किमान तीन महिने शाळेत जाता येत नाही. त्यामुळे त्यांचे कायम शैक्षणिक नुकसान होते.

( हेही वाचा: SBI बॅंकेकडून कोणत्याही हमीशिवाय विना व्याज २५ लाख कर्ज? पीआयबीने दिले स्पष्टीकरण )

पूल बांधण्याची ग्रामस्थांची मागणी 

या पूलाच्या मागणीसाठी अनेक निवेदने देण्यात आली आहेत. परंतु अद्याप तरी पूल तयार न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या शेतक-यांची तसेच शाळकरी मुलांची अडचण समजून घेऊन या ठिकाणी पूल बांधावा,  अशी मागणी ग्रामस्थांच्यावतीने केली जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here