लोणावळ्यातील (Lonavala) एकवीरा गडावर (Ekvira Devi Temple) देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडून मधमाशांच्या पोळ्याला इजा झाली. त्यामुळे मधमाश्यांनी भाविकांनी हल्ला चढवला. (honeybee attack) या हल्ल्यात अनेक जखमी झाले असून, गडावर एकच गोंधळ उडाला.
मुंबईच्या कुलाबा येथून देवीची पालखी गडावर पोहोचली होती. पालखीत सहभागी भाविकांनी मंदिराजवळ रंगीत धुराचे फटाके लावले. फटाक्यांच्या आवाजाने आणि धुरामुळे मंदिर परिसरातील मधमाश्यांच्या पोळ्याला धक्का बसला. त्यामुळे मधमाशांनी भाविकांवर हल्ला चढवला. मात्र गडावर फटाके वाजवण्यावर बंदी असताना ही काही भाविक याकडे दुर्लक्ष करतात, याकडे स्थानिकांनी लक्ष वेधले.
(हेही वाचा – Mumbai Police : मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाचे गिफ्ट; चोरीला गेलेले ५०० मोबाईल फोनचे मुळ मालकांना वितरण)
शिर्डी (Shirdi) येथेही साईभक्तांना आरतीची संधी
साईबाबा संस्थानने आज भक्तांना अनोखी भेट दिलीय. तासनतास रांगेत उभे राहून दर्शन घेत असलेल्या सामान्य साईभक्त जोडीला आजपासून साईबाबांच्या आरतीला अग्रभागी उभे रहाण्याचा मान दिला जाणार आहे. पंढरपूरच्या धर्तीवर घेतलेल्या या निर्णयाची ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. दररोज होणा-या साई बाबांच्या माध्यान्ह, धूप आणि शेज आरतीला एका भाग्यशाली जोडीला आरतीला पुढे उभं राहण्याचा मान मिळणार आहे. आरती सुरू होण्यापुर्वी सामान्य दर्शनरांग थांबवली जाते. या वेळी जी जोडी सर्वात पुढे असेल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन स्थगित
नाशिक येथील त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) मंदिरात व्हीआयपी दर्शन सेवा बंद 5 जानेवारीपर्यंत बंद करण्यात आली आहे. नाताळातील सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community