राज्यातील प्रत्येक विभागातील 100 शेतकऱ्यांच्या खात्यात ‘नमो शेतकरी महासन्मान योजने’अंतर्गत गणेशोत्सवापूर्वी 2000 रुपये जमा होणार आहेत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या योजनेअंतर्गत ही मदत केली जाणार आहे. या योजनेत येणाऱ्या तांत्रिक अडचणीही दूर झाल्या आहेत.
‘नमो शेतकरी महासन्मान योजने’अंतर्गत राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. साध्या कोकण आणि नागपूर विभाग वगळता उर्वरित 20 ते 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. 1 जून ते 11 सप्टेंबर या काळात त्या जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 60 सुद्धा पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. यंदा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला आहे. त्यामुळे त्यांना पीकविमा संरक्षित योजनेअंतर्गत सरकारला विमा कंपन्यांना 1551 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधीचा 14वा हप्ता मिळाला. त्यांना राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी सरकारला 1 हजार 712कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही. मालमत्तेची एकत्रित नोंददेखील केलेली नाही, अशांची यादी प्रसिद्ध करून चावडी वाचन केले जाणार आहे.
(हेही वाचा – Manoj Jarange Patil : अखेर जरांगे पाटलांनी घेतलं सलाईन; लवकरच घेणार पुढचा निर्णय)
ई-केवायसी बंधनकारक…
केंद्र सरकारने प्रधानमंत्री शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी लाभार्थींना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. त्यामुळे कृषी विभागाला राज्यातील 5 लाख 45 हजार शेतकऱ्यांनी ई-केवायसी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करून घ्यावी लागणार आहे. ज्यांची ई-केवायसी नाही, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नसून राज्य सरकारकडून महासन्मान योजनेचा दुसरा हप्ता वितरित केला जाणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community