राज्य सरकारने गणेशोत्सवामध्ये निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र टप्प्याटप्प्याने सरकार त्याची घोषणा करत आहे. त्याकरता सरकार कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याचा दाखला देत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता राज्य सरकारने मध्य मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ झाल्याचा दाखला देत गणेशोत्सव काळात लालबाग, परळ, शिवडी, नायगाव या भागात गणेशभक्तांना प्रवेश बंदी करण्याच्या विचारात आहे. त्यामुळे गणेशभक्तांचा यंदाही हिरमोड होणार आहे.
रुग्ण संख्येत वाढ!
राज्य सरकार मध्य मुंबईत कोरोनाच्या रुग्ण संख्येचा आलेख वाढत असल्याचे कारण देत आहे. संपूर्ण मुंबईत लालबाग, परळ, शिवडी आणि नायगाव या भागातील रुग्ण संख्या सर्वाधिक असल्याचा दावा केला आहे. म्हणूनच या भागात गणेशोत्सव काळात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला आहे. अशा वेळी या भागात गणेशोत्सव काळात गर्दी होऊ नये म्हणून सरकारने या भागात गणेशोत्सव काळात राज्यभरातून येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवेश बंदी केली आहे.
(हेही वाचा : …तर यापुढे कोरोनाची ‘महाराष्ट्र सरकार व्हायरस’ ओळख! मनसेचा टोला)
यंदाही गणेशभक्तांचा हिरमोड!
दरम्यान मागील वर्षी कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यात आला नाही. मुंबईत मोठ्या गणेश मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापनाही केली नव्हती. त्यामुळे यंदाच्या वर्षी रुग्ण संख्या कमी असल्याने गणेशोत्सव साजरा करता येणार, अशी अशा निर्माण झाली होती. मात्र लागलीच हा हिरमोड झाला आहे, कारण राज्य सरकारने मध्य मुंबईत कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने या भागात गणेशभक्तांना प्रवेश बंदी आणण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. हा भाग गणेशोत्सव काळात महत्वाचा असतो. त्यामुळे येथील मोठ्या गणेश मंडळांच्या गणपतींचे गणेशभक्तांना ऑनलाईन गणेश दर्शन घ्यावे लागणार आहे.
Join Our WhatsApp Community