Beggars In Pakistan : पाकिस्तान भिकाऱ्यांचा निर्यातदार ?; जगभरातील 90 टक्के भिकारी पाकिस्तानी असल्याचा अहवाल.. काय म्हणाले अधिकारी

202
Beggars In Pakistan : पाकिस्तान भिकाऱ्यांचा निर्यातदार ?; जगभरातील 90 टक्के भिकारी पाकिस्तानी असल्याचा अहवाल
Beggars In Pakistan : पाकिस्तान भिकाऱ्यांचा निर्यातदार ?; जगभरातील 90 टक्के भिकारी पाकिस्तानी असल्याचा अहवाल

एकीकडे शेजारी देश भारताचा जगभरात दबदबा वाढत असतांना पाकिस्तानने मात्र वेगळाच अभ्यास केला आहे. (Beggars In Pakistan) पाकिस्तानी प्रसारमाध्यम डॉनने एक अभ्यास केला आहे. जगभरात अटक करण्यात आलेल्या भिकार्‍यांपैकी 90 टक्के पाकिस्तानी वंशाचे असल्याचा आपल्याच देशासाठी अपमानकारक असलेला अहवाल डॉनने प्रसिद्ध केला आहे. सीनेटच्या परदेशी पाकिस्तानींच्या स्थायी समितीला सांगण्यात आले की, पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात भिकारी परदेशात जात आहेत. यामुळे मानवी तस्करीला आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.

(हेही वाचा – Manipur Violence : मणिपूर हिंसाचाराची झळ थेट मुख्यमंत्र्यांनाही; CM बिरेन सिंह यांच्या घरावर हल्ला)

तीर्थयात्रेच्या नावाखाली पाकिटमारी

अनेक भिकाऱ्यांनी सौदी अरेबिया, इराण आणि इराकला भेट देण्यासाठी तीर्थयात्री व्हिसाचा फायदा घेतला आहे. हरामसारख्या पवित्र ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाकिटमारांना अटक करण्यात आली आहे. नंतर त्यांची ओळख पाकिस्तानी नागरिक अशी झाली. सध्या पाकिस्तानमध्ये सुमारे 50 हजार अभियंते बेरोजगार आहेत, असे पाकच्या परदेश मंत्रालयाचे सचिव झुल्फिकार हैदर यांनी सीनेटच्या परदेशी पाकिस्तानींच्या स्थायी समितीला सांगितले. (Beggars In Pakistan)

”पाकिस्तानचे सुमारे 30 लाख लोक सौदी अरेबियामध्ये, सुमारे 15 लाख यूएईमध्ये आणि 2 लाख कतारमध्ये राहतात. त्यामुळे पाकिस्तानी कामगारांची विश्वासार्हता आणि त्यांच्या कौशल्याबाबत चिंता वाढत आहे”, असे हैदर पुढे म्हणाले.

भारत चंद्रावर; पाक अडखळत आहे

भारत चंद्रावर पोहोचला आहे; पण आपण अजूनही अडखळत आहोत. भारत आणि नेपाळच्या लोकांना जे भत्ते मिळतात. त्यापेक्षा कमी पैशात काम करायला आमचे लोक आता तयार आहेत. सौदी अरेबियासुद्धा आता प्रशिक्षणाशिवाय येणाऱ्या लोकांऐवजी कुशल मजुरांना प्राधान्य देतो, असे खासदार राणा मेहमुदुल हसन म्हणाले. (Beggars In Pakistan)

95 दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेखाली

नुकताच जागतिक बँकेने पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचा अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यानुसार पाकिस्तानातील 95 दशलक्ष लोक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत आहेत. एकूण 24 कोटी लोकसंख्येच्या हे प्रमाण 39.4 टक्के आहे. त्यांची रोजची कमाई 3.65 डॉलर म्हणजे 1,048 पाकिस्तानी रुपये आहे. भारतीय चलनात ते 300 रुपये इतके आहे.

भिकाऱ्यांना हजला पाठवू नका – सौदीने पाकला स्पष्टच सांगितले

सौदी अरेबियाने परदेशी अधिकाऱ्यांच्या बैठकीत पाकिस्तानला हज कोटा देताना काळजी घेण्यास सांगितले आहे. सौदीच्या अधिकाऱ्यांनी ‘पाकिस्तानला भिकारी आणि खिसेकापू पाठवू नका’, असे सांगितले आहे. सौदी अरेबियाने सांगितले की, त्यांच्या तुरुंगात अशा लोकांचा भरणा आहे. (Beggars In Pakistan)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.