उरण ते बेलापूर दरम्यान राहणाऱ्या नागरिकांचा प्रवास लवकरच जलद आणि स्वस्तात होणार आहे. मध्य रेल्वेचा चौथा उपनगरीय मार्ग अर्थात बेलापूर-खारकोपर-उरण मार्गावर दर दहा मिनिटांच्या अंतराने लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वेने केले आहे. यासाठी चेन्नईस्थित इंटिग्रल कोच फॅक्टरीतून तीन नवीन रेल्वेगाड्या मुंबईत दाखल होणार आहेत.
( हेही वाचा : बेस्टच्या ‘हॉप ऑन हॉप ऑफ’ बससेवेला प्रवाशांची प्रतीक्षा )
दर दहा मिनिटांनी लोकल फेऱ्या
ठाणे, बदलापूर, पालघर, डहाणू या भागात अगदी झपाट्याने शहरीकरण होत आहे. खारकोपर ते बेलापूर आणि बेलापूर ते नेरूळ अशा सध्या एकूण ४० लोकल फेऱ्या धावतात. उरणपर्यंत मार्ग तयार झाल्यावर दर दहा मिनिटांनी लोकल फेऱ्या चालवण्याचे नियोजन मध्य रेल्वेचे आहे. यासाठी सध्याच्या फेऱ्यांचा विस्तार करणे, नवीन फेऱ्या सुरू करणे आणि अन्य कोणत्या स्थानकावरून लोकल सुरू करता येईल या सर्व पर्यायांचा विचार करण्यात येणार आहे.
४०० किलोमीटरपर्यंत लोकल सेवेचा विस्तार
प्रवाशांसाठी ४०० किलोमीटरपर्यंत लोकल सेवेचा विस्तार करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. हा विस्तार पूर्ण करण्यासाठी बेलापूर-उरण मार्ग, कर्जत – पनवेल नवीन रेल्वेमार्ग, विरार-डहाणू चौपदरीकरण या प्रकल्पांची पूर्ती होणे गरजेचे आहे. या नव्या प्रकल्पामुळे महामुंबईतील नवी शहरे लोकलच्या टप्प्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community