Belated ITR For FY2024 : आर्थिक विवरणपत्र भरण्याची ही आहे अखेरची संधी

Belated ITR For FY2024 : जुलै महिन्यात विवरणपत्र भरून झालं नसेल तर ३१ डिसेंबर शेवटची मुदत आहे 

91
Belated ITR For FY2024 : आर्थिक विवरणपत्र भरण्याची ही आहे अखेरची संधी
Belated ITR For FY2024 : आर्थिक विवरणपत्र भरण्याची ही आहे अखेरची संधी
  • ऋजुता लुकतुके

आर्थिक विवरणपत्र भरण्यासाठी ३१ जुलै ही शेवटची तारीख यंदा होती हे आपल्याला माहीत आहे. पण, काही कारणांनी त्या तारखेपर्यंत विवरणपत्र भरता आलं नसेल तर तुमच्याकडे अखेरची संधी आहे. वेळेनंतर भरलेलं विवरणपत्र हे विलंबित विवरणपत्र म्हणून घरलं जातं. ते तुम्हाला ३१ डिसेंबरपर्यंत भरता येतं. अर्थात, त्यासाठी तुम्हाला ५,००० रुपये इतकं विलंबित शुल्कही भरावं लागतं. त्याविषयीची सगळी माहिती इथं समजून घेऊया. (Belated ITR For FY2024)

तुम्ही ३१ जुलैच्या मुदतीत आर्थिक विवरणपत्र भरलेलं नसेल तर आयकर कायद्याच्या कलम २३४ एफ नुसार, तुम्ही विलंबित विवरणपत्र भरू शकता. त्यासाठी तुमच्याकडून ५,००० रुपये इतका दंड आकारण्यात येतो. पण, तुमचं एकूण उत्पन्न ५,००,००० रुपयांपेक्षा कमी असेल तर हेच विलंब शुल्क १,००० रुपयांपर्यंत खाली येतं. पण, तुमचं उत्पन्न करपात्र असेल आणि तुमचं करदायित्वही असेल तर त्यासाठी तुम्हाला बाकी असलेल्या आयकरावर व्याजही भरावं लागेल. (Belated ITR For FY2024)

(हेही वाचा- godrej bkc mumbai : वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सबद्दल ह्या अद्भुत गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?)

  • विलंबित आयकर विवरणपत्र कुणी भरायचं?

३१ जुलैच्या मूळ मुदतीत ज्या करदात्यांनी विवरणपत्र भरलेलं नसेल त्या सर्वांना विलंबित विवरणपत्र भरता येईल. १३९(१) अंतर्गत तुम्हाला नियमित विवरणपत्र भरता येतं. पण, ही मुदत हुकली तर कायद्याने तुम्हाला १३९(४) अंतर्गत विवरणपत्र भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. विलंब शुल्कासह हे विवरणपत्र भरता येतं. (Belated ITR For FY2024)

  • विलंबित विवरणपत्रावर लागू होणारा दंड?

३१ डिसेंबरपूर्वी विलंबित विवरणपत्र भरल्यास १,००० ते ५,००० रुपये इतकं विलंब शुल्क आकारण्यात येतं

विलंबित विवरणपत्र ३१ डिसेंबर ते ३१ मार्च दरम्यान भरलं गेलं तर विलंब शुल्क १०,००० रुपये इतकं आहे

शिवाय तुमचं करदायित्व असेल तर कर भरतानाही तुम्हाला आयकर विभागाला अतिरिक्त व्याज द्यावं लागतं. ही रक्कम नेमकी किती असेल ते वेबसाईटवर कळतं (Belated ITR For FY2024)

(हेही वाचा- बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणाकरिता तातडीने उपाययोजना कराव्यात – Satyajeet Tambe)

आर्थिक वर्ष संपेपर्यंत तुम्हाला विवरणपत्र निदान विलंबित शुल्क भरून भरता येतं. पण, ३१ मार्चला ते आर्थिक वर्ष संपलं की, तुम्हाला विवरणपत्र स्वत:हून भरता येत नाही. आयकर विभागाची नोटीस आली असेल तर त्याला उत्तर म्हणून तुम्ही दंड भरून विवरणपत्र भरू शकता. पूर्वी विवरणपत्र न भरण्यासाठी काही अगदीच गंभीर कारण असेल तर त्याची शाहनिशा करून आयकर विभाग तुम्हाला विलंबित विवरणपत्र भरण्याची परवानगी देऊ शकतो. (Belated ITR For FY2024)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.