संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या आणि कन्नड भाषिकांच्या भावना दुखाविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या १८ पदाधिकाऱ्यांविरोधात मार्केट पोलिस ठाण्यात गुरुवारी (२नोव्हेंबर ) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Maharashtra Ekikaran Samiti)
एकीकरण समितीतर्फे दरवर्षी १ नोव्हेंबरला काळा दिन पाळला जातो.त्याप्रमाणे यावेळीही याची तयारी करण्यास सुरवात झाली होती. शिवाय या दिनासाठी व्यापक जनजागृतीही करण्यात आली होती. यामुळे फेरीला व्यापक प्रतिसाद लाभला. धर्मवीर संभाजी मैदान येथून फेरीला सुरुवात झाली. त्यानंतर मराठा मंदिर येथे जाहीर सभा घेण्यात आली होती. या फेरीत हजारो लोक सहभागी झाले होते.मात्र, या फेरीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व कर्नाटक सार्वभौमत्वाला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केला, असा आरोप करत मार्केट पोलिसांनी स्वतःहून गुन्हा दाखल करून घेतला असल्याचे बोलले जात आहे. त्यानुसार १८ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बेळगावसह सीमाभागातील ८६५ गावे महाराष्ट्रात समाविष्ट करण्यात यावीत, या मागणीकडे केंद्राचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे १ नोव्हेंबर रोजी काळादिनानिमित्त निषेध फेरी काढण्यात आली होती. या दरम्यान संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्या व कन्नड भाषिकांच्या भावना दुखाविण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात माजी आमदार मनोहर किणेकर, मालोजी अष्टेकर, प्रकाश मरगाळे, सारिका पाटील, रणजित चव्हाण-पाटील, अंकुश केसरकर, नगरसेवक रवी साळुंखे, नगरसेविका वैशाली भातकांडे, गजानन पाटील, शिवाजी सुंठकर, एम. जे. पाटील, आर. एम. चौगुले, नेताजी जाधव, सरस्वती पाटील, विकास कलघटगी आदींचा समावेश आहे. याशिवाय अनोळखी दीड हजार जणांविरोधात मार्केट पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community