Benefit Cooking Clay Pot : मातीच्या भांड्यात अन्न का शिजवावे, वाचा संशोधकांचे उत्तर

अन्नातील पीएच पातळी संतुलित राखता येते

180
Benefit Cooking Clay Pot : मातीच्या भांड्यात अन्न का शिजवावे, वाचा संशोधकांचे उत्तर
Benefit Cooking Clay Pot : मातीच्या भांड्यात अन्न का शिजवावे, वाचा संशोधकांचे उत्तर

मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्याने कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते, कारण मातीच्या भांड्यात अन्नपदार्थ शिजवल्यामुळे (Benefit Cooking Clay Pot) ते जास्त पौष्टिक होतात. महिलांमधील अॅनिमिया तसेच खनिजांची कमतरता दूर करण्यासाठी मातीच्या भांडीत अन्नामुळे मदत होते, असा दावा संशोधकांनी (Claim researchers) केला आहे.

याविषयी जयपूर येथील अमृत माटी इंडिया ट्रस्टने (Amrit Mati India Trust) संशोधन केले होते. या नव्या संशोधनावरून असे सिद्ध झाले की, मातीच्या भांड्यात क्षाराचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे अन्नातील पीएच पातळी संतुलित राखता येते. त्यामुळे पचन योग्य पद्धतीने होण्यास मदत होते.

कोणत्या भांड्यात अन्न शिजवल्यास पोषणमूल्ये कोणती?

घटक            प्रेशर कुकर      मातीची भांडी
कर्बोदके          ४१.५७ ग्रॅम       ५०.७३ ग्रॅम
फायबर            ९.६४ ग्रॅम        १६.६४ ग्रॅम
प्रथिने               ११.१९ ग्रॅम       १३.०८ ग्रॅम
जीवनसत्त्व ए        ० मिलिग्रॅम      १००.५ मिलिग्रॅम
जीवनसत्त्व सी       १.७३ मिलिग्रॅम  ३.७९ मिलिग्रॅम
कॅल्शियम           ११.९७ मिलिग्रॅम  ३६.५३ मिलिग्रॅम
लोह                २.७५ मिलिग्रॅम    ३.८१ मिलिग्रॅम

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.