- ऋजुता लुकतुके
बेनेली कंपनीने जानेवारी २०२३ च्या ऑटो एक्स्पोमध्ये ही बाईक पहिल्यांदा लोकांसमोर आणली होती. (Benelli 752 S)
यावर्षी जानेवारी महिन्यात अधिकृत घोषणा झालेली बेनेली कंपनीची नवीन ७५२ एस ही बाईक पुढील वर्षी भारतीय बाजारात प्रवेश करणार आहे. इटलीची कंपनी असलेली बेनेली आपल्या ड्युकाटीसारख्या स्टायलिंगसाठी प्रसिद्ध आहे. पण, किंमत त्या मानाने वाजवी असते. नावात आहे त्याप्रमाणे ७५२ सीसी क्षमतेचं इंजिन या बाईकमध्ये आहे. (Benelli 752 S)
गाडीचा हेडलँप लंबगोल आकाराचा आहे. तसंच ट्विन लिक्विड कूल इंजिन आहे जे ७७ बीएचपी, ६७ एनएम इतकी शक्ती निर्माण करू शकतं. (Benelli 752 S)
We are proud to announce the launch of Benelli 752S in India, at an introductory price of Rs. 6.99 Lakhs (Ex-showroom).
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.Now here’s a tagline we can all dream about till it becomes a reality. 😉 #Stayhome #Staysafe #Aprilfool pic.twitter.com/ovNsEdrPDx
— Benelli India (@BenelliIndia) April 1, 2020
(हेही वाचा – Ram Mandir: अयोध्येत प्रथमच विमान उतरले, चाचणी यशस्वी झाल्यावर केंद्रीय मंत्री म्हणाले? वाचा सविस्तर…)
बाईकची इंधनाची टाकी १५ लीटर क्षमतेची आहे. ६ स्पीड मॅन्युअल गिअर ट्रान्समिशन आहे. तर सेल्फ स्टार्ट, अद्ययावत एबीएस ब्रेक प्रणाली या सुविधा आहेत. तर डिस्प्लेमध्ये घड्याळही आहे. या बाईकची किंमत ६ लाखांपासून सुरू होते. आणि कावासाकी निंजा ४००, यामाहा वाय३, एप्रिलिया एनएस या बाईकशी तिची स्पर्धा आहे. (Benelli 752 S)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community