बांगलादेशमध्ये (Bangladesh) बंगाली नववर्षाचे इस्लामिक सणात रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही कट्टरपंथी दि. १४ एप्रिल रोजी ‘पोहेला बोइशाख’ (Pôhela Boishakh) निमित्ताने १०० गाईंची कत्तल करण्याची धमकी देत आहेत. दोन महिन्यापेक्षा कमी कालावधीत होणाऱ्या या सणामुळे हिंदू समाजाची चिंता वाढली आहे. ‘पोहेला बोइशाख’ हा वसंत ऋतूच्या आगमनाचा आणि कापणीच्या हंगामाच्या आनंदाचा उत्सव साजरा करणारा सण आहे.
( हेही वाचा : मुंबईसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर; Supreme Court मध्ये ४ मार्चपर्यंत सुनावणी स्थगित)
दरवर्षी ‘पोहेला बोइशाख’ (Pôhela Boishakh) हा सण ढाका येथील रमना पार्क येथील रमना बतामुल वटवृभाखाली आयोजित केला जातो. हा कार्यक्रम छायानट संगीत विद्यालयात चालवला जातो. हा सांस्कृतिक कार्यक्रम १९६१ साली बंगाली संस्कृती आणि संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केला गेला होता. दि. १८ फेब्रुवारी रोजी, बांगलादेशच्या (Bangladesh) अंतरिम सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे सल्लागार मुस्तफा सरवर फारुकी (Mostofa Sarwar Farooki) यांना गाईंच्या कत्तलीबद्दल देण्यात आलेल्या धमकीबद्दल विचारले. एका पत्रकाराने सांगितले की, गाईंच्या कत्तलीसारख्या धमक्या सोशल मीडियावर उघडपणे दिल्या जात आहेत. परंतु फारूकी यांनी याबद्दल कोणतेही भाष्य केले नाही. ते म्हणाले, लोक सोशल मीडियावर खूप काही लिहतात. प्रत्येक गोष्टीबद्दल प्रतिक्रिया देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.
त्यानंतर फारुकी म्हणाले, “पोहेला बोइशाख’ (Pôhela Boishakh) हा एक मोठा सण आहे. तो नेहमीप्रमाणे साजरा केला जाईल. मी एवढेच म्हणू शकतो.” तथापि, स्वतःला ‘तौहिदी जनता’ म्हणवणाऱ्या इस्लामिक कट्टरपंथीयांचा एक जमाव हिंदूंवर सतत हल्ला करत आहे. रमणा पार्कमध्ये १०० गायींची कत्तल करण्याची धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे. याआधीही १४ एप्रिल २००१ रोजी इस्लामिक दहशतवादी संघटना ‘हरकत-उल-जिहाद-अल-इस्लाजी’ (Harkat-ul-Jihad al-Islami) ने रमणा पार्कमध्ये दोन बॉम्बस्फोट घडवून आणले होते, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता आणि ५० हून अधिक जण जखमी झाले होते.(Muhammad Yunus)
त्या हल्ल्यातील आठ दहशतवादी, मुफ्ती अब्दुल हन्नान, मौलाना अकबर हुसेन, मौलाना मोहम्मद ताजुद्दीन, हाफिज जहांगीर आलम बदर, मौलाना अबू बकर, मुफ्ती शफीकुर रहमान, मुफ्ती अब्दुल हैई आणि आरिफ हसन यांना २०१४ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणात, मौलाना अबू ताहेर, मौलाना सब्बीर उर्फ अब्दुल हन्नान, मौलाना याह्या, मौलाना शौकत उस्मान, मौलाना अब्दुल रौफ आणि शहादत उल्लाह यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. पण ताजुद्दीन, हाफिज जहांगीर, मौलाना अबू बकर, मुफ्ती शफीकुर आणि मुफ्ती है सारखे दहशतवादी २४ वर्षांनंतरही फरार आहेत.
‘पोहेला बोइशाख’ (Pôhela Boishakh) सणादरम्यान मिळालेल्या धमकीबद्दल मोहम्मद युनूस (Muhammad Yunus) सरकारकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. त्यामुळे हिंदू समाजात चिंतेचे वातावरण पसरले आहे. शेख हसीना सत्तेतून पायउतार होताच बांगलादेशातील हिंदूंवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले आहेत.
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community