सिक्युरिटी गार्डनेच एटीएम फोडून 20 लाख केले लंपास, कारण वाचून थक्क व्हाल

132

एटीएम मशीन फोडून त्यातून पैशांची चोरी करण्याचे प्रकार आजवर अनेकदा घडले आहेत. त्यामुळे अशा चो-यांना आळा घालण्यासाठी एटीएम सेंटरजवळ 24 तास सिक्युरिटी गार्ड तैनात करण्यात येतात. पण बंगळुरूमध्ये एटीएमच्या सिक्युरिटी गार्डनेच एटीएम मशीनमधून 20 लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे कुंपणच शेत खात असल्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

20 लाखांची चोरी

बंगळुरू येथील विल्सन गार्डनच्या 13 क्रॉस परिसरातील युनियं बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनमधून दीपांकर नामोसूद्र या सिक्युरिटी गार्डने 20 लाख रुपयांची चोरी केली आहे. सहा महिन्यांपूर्वीच तो एटीएमचा सिक्युरिटी गार्ड म्हणून रुजू झाला होता. हे कृत्य करुन तो आसामला पळून गेला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून 14.2 लाख रुपयांची रोकड पोलिसांनी जप्त केली आहे. हे पैसे चोरुन प्रेयसीसोबत लग्न करण्याचा त्याचा डाव होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

(हेही वाचाः आता कुत्र्यांप्रमाणेच मांजरींचीही नसबंदी होणार, महापालिकेचा निर्णय)

अशी केली चोरी

दीपांकरने एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी येणा-या कर्मचा-यांशी चांगली मैत्री करुन घेतली होती. एटीएम मशीनमधील पैशांची कॅसेट काढण्यासाठी वापरला जाणारा पासवर्डही त्याने गुपचूप माहीत करुन घेतला होता. त्यानंतर 17 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7.50 ते 8.20 च्या दरम्यान दीपांकरने एटीएम मशीनमधून पैसे चोरले आणि तिथेच त्याने कपडे बदलले.

सीसीटीव्ही कॅमे-यात आपली चोरी पकडली जाऊ नये म्हणून त्याने कॅमेरा मागे वळवला आणि एटीएम सेंटरमधील लाईटही बंद केले. पण तरीही उपरवाला सब देखता है म्हणत सीसीटीव्ही कॅमे-याने हा संपूर्ण प्रकार टिपला. त्यानंतर दीपांकर फरार झाला होता.

(हेही वाचाः फक्त ‘ही’ गोष्ट करा आणि 68 लिटरपर्यंतचे पेट्रोल-डिझेल मोफत मिळवा)

पोलिसांनी घेतले ताब्यात

बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापकांनी या प्रकरणाची तक्रार केली असता, दीपांकरला पकडण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले. या पथकाने आसाममधील सिक्युरिटी गार्डच्या मूळ गावी जाऊन त्याला अटक केली. आपल्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी त्याने ही चोरी केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.