बेंगळुरूमध्ये (Bengaluru) एक मुस्लिम मुलगी आणि हिंदू (Hindu) मुलाच्या छळाचे प्रकरण उघडकीस आले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि पाच मुस्लिम मुलांना अटक केली. या संपूर्ण प्रकरणाबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र आणि कर्नाटक सरकारमधील सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री प्रियांक खरगे यांनी टीका केली. ते म्हणाले की, हे उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) , बिहार (Bihar) किंवा मध्य प्रदेश नाही, कर्नाटकात अशा कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत. या विधानानंतर लोकांनी प्रियांक खरगे (Priyank Kharge) यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
( हेही वाचा : आता शिवरायांचा अवमान करणाऱ्यांची खैर नाही ; CM Devendra Fadnavis यांची अमित शाहांसमोर मोठी मागणी)
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दि. ९ एप्रिलला बेंगळुरूच्या (Bengaluru) चंद्रा लेआऊट (Chandra Layout) परिसरातील एका पार्कमध्ये बुरखा घालतेली मुलगी एका हिंदू (Hindu) मुलासोबत स्कूटीवर बसली होती. दोघांना एकत्र बसून बोलत असल्याचे पाहून मुस्लिम (Muslim) कट्टरपंथी तरुण तिथे आले. ते तरुण म्हणाले की, मुलीला विचारण्यात आले की ती कुठे राहते आणि इथे काय करत आहे? त्यांनी पीडितांना धमकी देत विचारले की, “”तुला लाज वाटत नाही का?” असेही विचारले जाते की तो दुसऱ्या धर्माच्या मुलीसोबत का बसला आहे. यानंतर धर्मांधांनी हिंदू (Hindu) मुलीला लाकडी काठीने मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.
व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत पाच गुन्हेगारांना अटक केली. या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना प्रियांक खरगे (Priyank Kharge) म्हणाले, “अशा घटना निंदनीय आहेत. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारची हिंसा सहन केली जाणार नाही. हे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश नाही. कर्नाटक हे एक प्रगतीशील राज्य आहे.” असेही ते म्हणाले. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश राज्यातील भाजपाप्रणित सरकारवर टीका करण्याची संधी त्यांनी यावेळीही सोडली नाही. ज्यामुळे कर्नाटकातील हिंसा सोडून इतर मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे, असे म्हणत लोकांनी संतप्त प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. दरम्यान, पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. (Hindu)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community