Muslim : बंगळुरूमध्ये ‘शरीफ’ बनला बेशरम; परदेशी नागरीकाचा केला छळ

कर्नाटक पोलिसांनी नवाब शरीफच्या विरुद्ध कलम ९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

148

बंगळुरूमध्ये एका विदेशी ब्लाॅगरसोबत गैरवर्तन केल्याच्या आरोपावरुन पोलिसांनी नवाब हयात शरीफ या मुसलमान व्यक्तीला चोर बाजारातून अटक केली आहे. डच यूट्यूबर पेड्रो मोटा याच्याशी गैरवर्तन करताना तो दिसला.

समोर आलेल्या व्हिडीओमध्ये व्लॉगर व्हिडीओ बनवत चालत असता शरीफने त्याला रोखले आणि हे काय सुरु आहे, अशी विचारणा केली. त्यानंतर शरीफने त्या व्लॉगरचा हात खेचू लागला. हे सर्व प्रकरण कॅमेरात कैद झाले आहे.

(हेही वाचा Sharad Pawar : कर्मकांडाला थोतांड म्हणून हिणवणाऱ्या शरद पवारांना नातू रोहित पवारांची चपराक)

बेंगळुरूच्या पश्चिम विभागाचे डीसीपी लक्ष्मण निंबर्गी यांनी या संदर्भात सांगितले की, घटनेच्या या पार्श्वभूमीवर कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल. विदेशी पर्यटकांशी गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. डीसीपी यांनी माहिती दिली आहे की, कर्नाटक पोलिसांनी नवाब शरीफच्या विरुद्ध कलम ९२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. पण YouTuber ने 11 जून रोजी त्याचा अनुभव शेअर केला तेव्हा हे समोर आले. त्याच्या व्हिडीओसोबत त्याने लिहिले की, बंगळुरू एक्सप्लोर करत असताना एका रागावलेल्या माणसाने मला पकडले आणि हात फिरवायला सुरुवात केली. मी मोठ्या कष्टाने पळून जाण्यात यशस्वी झालो.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.