बेस्ट उपक्रम मकरसंक्रांतीच्या मुहुर्तावर मुंबईकरांना ५० एसी इलेक्ट्रिक डबलडेकर बसची सुविधा देणार आहे. बेस्टच्य ताफ्यात जानेवारीमध्ये ५० एसी डबलडेकर बस येतील त्यानंतर हळूहळू डिसेंबरपर्यंत ९०० इलेक्ट्रिक बसेस ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे जुन्या झालेल्या ४ डबलडेकर गाड्या २०२३ पर्यंत भंगारात काढल्या जाणार आहे. बेस्टने प्रवासी क्षमतेत वाढ करण्यासाठी, प्रदूषणमुक्त प्रवास आणि डिझेल खर्चात कपात करण्यासाठी इलेक्ट्रिक एसी डबलडेकर सेवेत आणण्याचे ठरविले आहे.
( हेही वाचा : ‘बेस्ट’ ई-टॅक्सी लवकरच येणार प्रवाशांच्या सेवेत; ओला-उबेरपेक्षा स्वस्तात होईल प्रवास!)
नव्या बसची वैशिष्ट्य
- प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
- नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
- नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
- बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
- दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
- प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक
बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा
दरम्यान, मुंबईतील वाहतूककोंडीपासून आणि रिक्षा-टॅक्सीच्या वाढत्या दरांपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मोबाईल अॅपआधारित बेस्टची ई-टॅक्सी सेवा लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जून २०२३ पर्यंत ५०० टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील अशी माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. ओला -उबेर यांसारख्या खासगी कंपन्यांपेक्षा याचे दर कमी असतील.
Join Our WhatsApp Community