बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात पहिली वातानुकूलित इलेक्ट्रिक डबलडेकर बस दाखल झाली आहे. रविवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही बस बेस्टच्या ताफ्यात सामील झाली अशी माहिती महाव्यवस्थापकांनी दिली. आरटीओचा क्लिअरन्स मिळाल्यानंतर डबलडेकर बस प्रवासी सेवेत येईल असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे वातानुकूलित डबलडेकर बसने गारेगार प्रवास करण्याची मुंबईकरांची प्रतीक्षा आता संपली आहे.
( हेही वाचा : फाळणीचे घाव; अजूनही हिंदू ‘घायाळ’)
साधारणत: पुढील आठवड्यापासून ही बस प्रवाशांच्या सेवेत येईल ही बेस्ट सेवा वांद्रे-कुर्ला संकुल ते वांद्रे स्थानक या मार्गावर धावणार आहे. बेस्ट उपक्रमामध्ये ४५ वातानुकूलित बस आहेत यातून ५४ ते ६० प्रवासी एकावेळी प्रवास करू शकतात परंतु या डबलडेकर बसमधून एकाचवेळी ७६ प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, चालक-वाहन यांच्यातील संपर्कासाठी विशेष व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच दोन्ही बाजूला स्वयंचलित दरवाजे अशी या बसची वैशिष्ट्ये आहेत.
नव्या बसची वैशिष्ट्य
- प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
- नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल.
- प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
- नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
- बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
- दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.
- प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक
बेस्ट इलेक्ट्रिक टॅक्सी सेवा
दरम्यान, मुंबईतील वाहतूककोंडीपासून आणि रिक्षा-टॅक्सीच्या वाढत्या दरांपासून नागरिकांची सुटका करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने मोबाईल अॅपआधारित बेस्टची ई-टॅक्सी सेवा लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जून २०२३ पर्यंत ५०० टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील अशी माहिती महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी दिली. ओला -उबेर यांसारख्या खासगी कंपन्यांपेक्षा याचे दर कमी असतील.
Join Our WhatsApp Community