‘बेस्ट’ AC डबल डेकर बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार; बसची वैशिष्ट्य, तिकीट किती असेल?

प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता. नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.

मुंबईत येत्या शुक्रवारपासून पहिली इलेक्ट्रिक वातानुकूलित डबल डेकर बेस्ट बस धावणार आहे. त्यामुळे एसी डबल डेकर बसमधून मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे.

किती असेल तिकीट ?

किमान अंतरासाठी ( ५ किलोमीटर) प्रवाशांना ६ रुपये तिकीट असणार आहे.

बसमार्ग

सुरूवातीच्या काळात बसेस पुढील तीन मार्गांवरून धावणार आहेत. यामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ केली जाणार आहे.

  • छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नरिमन पॉइंट
  • कुलाबा ते वरळी
  • कुर्ला ते सांताक्रुझ

नव्या बसची वैशिष्ट्य

  • प्रत्येक नव्या बसमध्ये दोन जिने असतील, जुन्या बसमध्ये फक्त एकच जिना होता.
  • नव्या बसमध्ये Digital तिकीटांची सोय असेल
  • प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील.
  • नवीन दुमजली बस भारत-६ श्रेणीतील असून या बसमध्ये स्वयंचलित गिअर आहे.
  • बस थांब्याची माहिती देण्यासाठी बसमध्ये इलेक्ट्रॉनिक बोर्ड असतील.
  • दोन स्वयंचलित दरवाजे असतील आणि ते उघडबंद करण्याचे नियंत्रण बसचालकाकडे असेल.

प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक

बेस्टकडे १५ वर्षांपूर्वी ९०१ दुमजली बस होत्या. डिसेंबर २०१९ पर्यंत या बसचा ताफा १२० होता आता दुमजली बसची संख्या ४५ आहे. एकमजली बसमधून ५४ ते ६० प्रवासी प्रवास करू शकतात मात्र दुमजली बसची क्षमता ७४ आहे. एकमजली आणि दुमजली बसचे आकारमानही सारखेच असते. त्यामुळे या दोन्ही प्रकारातील बस रस्ता व्यापण्याचे प्रमाण सारखेच आहे. त्यामुळे दुमजली बसमधून प्रवासी वाहून नेण्याची क्षमता अधिक असल्यामुळे उपक्रमाकडून दुमजली बसची संख्या वाढवण्यावर भर दिला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here