विमानतळ प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सेवा; चलो अ‍ॅपवरून करता येईल सीट बुकिंग

विमानाने मुंबईला येणाऱ्या प्रवाशांना विमानतळापासून त्यांच्या इच्छित स्थळापर्यंत आरामदायक प्रवास देण्याच्या उद्देशाने बेस्ट उपक्रमाने एअरपोर्ट छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (टी २) पासून दक्षिण मुंबई/बॅकबे आगार, एअरपोर्ट ते जलवायू विहार/खारघरद्वारा पाम बिच रोड आणि एअरपोर्ट ४ ते कॅडबरी जंक्शन/ठाणे अशा तीन वातानुकूलित इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्यात आल्या आहेत.

( हेही वाचा : अनंत चतुर्दशीला मुंबई सेंट्रल – चर्चगेट दरम्यान लोकल गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार)

या मार्गावर आता ९ सप्टेंबर २०२२ पासून बेस्टच्या चलो अ‍ॅपचा वापर करून तिकीटाचे आगाऊ आरक्षण करून प्रवासी सदर बससेवेचा लाभ घेऊ शकतात.

याकरता खालील प्रक्रिया प्रवाशांना फॉलो करावी लागेल…

  • गुगल प्ले स्टोअरवरून बेस्ट चलो अ‍ॅप डाऊनलोड करावे. त्यानंतर दक्षिण मुंबई/बॅकबेकरिता बसमार्ग क्रमांक ८८१, वाशी/खारघर करता बसमार्ग क्रमांक ८८२ आणि ठाण्याला जाण्यासाठी बस क्रमांक ८८४ सर्च बारमध्ये शोधा.
  • बसमार्गाची निवड केल्यावर रिझर्व सिट पर्याय निवडावा.
  • बसमध्ये चढण्याचे आणि उतरण्याचे ठिकाण निवडावे.
  • आपली वेळ निवडून तिकीटाची रक्कम भरावी.
  • आपली बस ट्रॅक करून आरक्षित केलेल्या आसनाद्वारे आरामदायक प्रवास करावा.
  • सर्व प्रवाशांनी या आरामदायक बससेवेचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here