‘बेस्ट’ उपक्रमाने जाहीर केली गहाळ झालेल्या फोनची यादी

मोबाईल फोन ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची व गरजेची वस्तू झालेली आहे. आपला मोबाईल फोन आपल्या जवळ नसला की, प्रत्येकजण बैचेन होतो. परंतु अनेकदा घाईगडबडीत आपला फोन गहाळ होतो किंवा हरवतो अशावेळी मात्र शोधाशोध करत हतबल होऊन अनेकजण पोलीस स्टेशनला तक्रार करतात. तुमचा फोन जर बसमध्ये हरवला असेल तर बेस्ट उपक्रमाने ज्यांचे फोन ऑक्टोबर २०२२ या महिन्यात गहाळ झाले आहेत अशा सर्व नागरिकांना दिलासा दिला आहे.

( हेही वाचा : ठाणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; परीक्षेविना केली जाणार निवड, मिळेल ३० हजारांपर्यंत पगार)

ट्विटरवर यादी जाहीर

बेस्ट उपक्रमाने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरून गहाळ किंवा बसमध्ये हरवलेल्या मोबाईल फोनची यादी जाहीर केलेली आहे. यामध्ये मोबाईल फोन हरवलेला दिनांक, बस क्रमांकाचा मार्ग, मोबाईल फोनचे नाव नमूद केलेले आहे. त्यामुळे ज्यांचे फोन हरवले आहेत त्यांनी तातडीने बेस्ट उपक्रमाशी संपर्क साधावा आणि हे मोबाईल फोन १५ डिसेंबर २०२२ च्या आधी आपल्या ताब्यात घ्यावेत असे आवाहन उपक्रमामार्फत करण्यात आले आहे.

या संकेतस्थळावर उपलब्ध

गहाळ वस्तूंची अधिक माहिती बेस्ट उपक्रमाच्या bestundertaking.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही बेस्टने स्पष्ट केले आहे.

बेस्टमध्ये ऑक्टोबर महिन्यात गहाळ झालेल्या मोबाईल फोनची यादी पुढीलप्रमाणे…

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here