बेस्ट उपक्रमाने प्रवाशांना सोयीस्कर प्रवास करता यावा, बस लोकेशन ट्रॅक करता यावे यासाठी चलो अॅपचे अनावरण केले. या अॅपमधून बसचे तिकीट काढल्यावर प्रवाशांना कमीत कमी २० टक्के तर जास्तीत जास्त ३४ टक्क्यांपर्यंत सवलत दिली जाते. त्यामुळे अनेकांनी चलो अॅपचा वापर करत ऑनलाईन/डिजिटल तिकीट काढण्याला प्रोत्साहन दिले. चलो अॅपच्या तिकीट योजनांमध्ये बेस्ट उपक्रमाने महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. या नव्या बदलांनुसार आता प्रवाशांना खालीलप्रमाणे सुविधा मिळतील.
( हेही वाचा : बेस्टमुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान; काय आहे कारण? )
नव्या योजना
- ७ दिवस १५ फेऱ्यांची सेवा – ६० रुपये ( ५ रुपये तिकिटासाठी)
- २८ दिवस ६० फेऱ्यांची सेवा – १९९ रुपये ( ५ रुपये तिकिटासाठी)
- ८४ दिवस ५० फेऱ्यांची सुविधा (यात बेस्ट बसच्या विविध सेवांचा लाभ प्रवासी घेऊ शकतात. )
या नव्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना चलो अॅप डाऊनलोड करावे लागेल. तुम्ही UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या साहाय्याने हे प्लॅन्स खरेदी करू शकता.
तुम्ही बसमधून प्रवास करताना स्टार्ट ट्रिप या पर्यायावर क्लिक केल्यावर तुमचा प्लॅन अॅक्टिव्हेट होईल. संबंधित वाहकाला तुम्हाला फक्त उतरण्याचे ठिकाण सांगावे लागेल यानंतर मोबाईलवर डिजिटल तिकीट उपलब्ध होईल. हे नवे प्लॅन्स चलो अॅप्सवर १ डिसेंबर २०२२ पासून सुरू होणार आहेत. या योजनांचा फायदा तुम्ही चलो कार्डावर सुद्धा ३ डिसेंबर २०२२ पासून घेऊ शकता.
सध्या ३० लाखांहून अधिक युजर्स बेस्टच्या चलो अॅपचा वापर करतात. तर दिवसाला ५ लाख प्रवासी डिजिटल तिकीट प्रणालीचा लाभ घेतात. या नव्या योजनांमुळे बेस्टच्या प्रवाशांना निश्चित फायदा होऊन प्रवासी संख्येत आणखी वाढ होईल असा दावा बेस्टने केला आहे.
बेस्टचे सुपर सेव्हर प्लॅन्सची संपूर्ण आकडेवारी
Join Our WhatsApp Community📢BEST announces New Super Saver Bus Travel Plans w.e.f. 1st December 2022 (Chalo App users) & from 3rd December 22 ( for Smart Card Users) 📢 pic.twitter.com/AOgUFBSH3S
— BEST Bus Transport (@myBESTBus) November 30, 2022