Best Bus Accident : पाच वर्षांत 834 अपघात, 88 नागरिकांचा मृत्यू; 42.40 कोटींची नुकसान भरपाई

193
Best Bus Accident : पाच वर्षांत 834 अपघात, 88 नागरिकांचा मृत्यू; 42.40 कोटींची नुकसान भरपाई
  • प्रतिनिधी

मुंबईतील बेस्ट प्रशासनाने मागील पाच वर्षांत घडलेल्या 834 बस अपघातांमध्ये 88 नागरिकांनी प्राण गमावल्याची माहिती दिली आहे. या अपघातांमुळे झालेल्या जीवितहानी आणि जखमींच्या नुकसानभरपाईसाठी 42.40 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच, अपघातांमुळे बेस्टच्या 12 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले असून, 24 कर्मचाऱ्यांना निलंबित केले गेले आहे. (Best Bus Accident)

आरटीआयद्वारे माहिती उघड

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागील पाच वर्षांतील बेस्ट बस अपघातांची माहिती विचारली होती. यावर बेस्टचे वरिष्ठ वाहतूक अधिकारी ईगाल बेंजामिन यांनी माहिती देताना सांगितले की, 352 अपघात बेस्टच्या बसमुळे तर 482 अपघात खाजगी कंत्राटदारांच्या बसमुळे घडले आहेत.

(हेही वाचा – Chhattisgarh Naxalism: छत्तीसगडमध्ये पाच नक्षलवादी ठार, दोन महिलांचाही समावेश)

प्रत्येक वर्षातील आकडेवारी

2019-20 : 9.55 कोटी नुकसानभरपाई, 51 प्रकरणे
2020-21 : 3.44 कोटी नुकसानभरपाई, 48 प्रकरणे
2021-22 : 9.45 कोटी नुकसानभरपाई, 99 प्रकरणे
2022-23 : 12.40 कोटी नुकसानभरपाई, 107 प्रकरणे
2023-24 : 7.54 कोटी नुकसानभरपाई, 89 प्रकरणे

कर्मचाऱ्यांवरील कारवाई

बेस्ट प्रशासनाने सांगितले की प्राणांतिक अपघातांसाठी जबाबदार 12 कर्मचारी बडतर्फ करण्यात आले आहेत. तर वैयक्तिक इजा झालेल्या प्रकरणांत 24 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय ताकीद, वसुली, श्रेणीत कपात अशा विविध प्रकारच्या शिस्तभंगाच्या कारवाया करण्यात आल्या आहेत. (Best Bus Accident)

(हेही वाचा – Viswanathan Anand : डी गुकेश, प्रग्यानंदा यांनी आनंदच्या घरी साजरा केला पोंगल, ‘लुंगी – डान्स’चे व्हीडिओ व्हायरल)

सुरक्षिततेची जबाबदारी अधोरेखित

अनिल गलगली यांनी या माहितीच्या आधारे सांगितले की, बेस्ट प्रशासनाला आणि बसचालक व कर्मचाऱ्यांना अधिक दक्षता घेण्याची गरज आहे. सुरक्षिततेसाठी सुधारित उपाययोजना राबवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

बेस्ट प्रशासनाच्या या आकडेवारीने मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा आणि सुरक्षेच्या गरजेसाठी नवी दिशा दाखवली आहे. (Best Bus Accident)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.