विशेष प्रतिनिधी,मुंबई
वांद्रे (प) येथील माऊंट मेरी यात्रा सप्टेंबर महिन्याच्या दुस-या आठवडयात रविवारी १०. सप्टेंबर २०२३ पासून सुरु होत असून ही यात्रा १७ सप्टेंबर२०२३ पर्यत भरणार आहे. या ‘माऊंट मेरी‘ यात्रेला मोठ्याप्रमाणात भाविक येत असल्याने वांद्रे रेल्वे स्थानक ते हिल रोड दरम्यान अतिरिक्त बस सेवा सुरु करण्यात आली आहे. या संपूर्ण आठवड्यात २८७ अतिरिक्त बसगाड्या सोडल्या जाणार असल्याचे उपक्रमाने स्पष्ट केले आहे.
या ‘माऊंट मेरी चर्च‘ येथे तसेच ‘फादर अॅग्नल आश्रम‘ या परिसरात येणाऱ्या यात्रेकरता भाविक मोठया प्रमाणावर वांद्रे स्थानक (प) येथे उपनगरीय रेल्वेने येऊन तेथून उपक्रमाच्या बसगाडयांचा लाभ घेत असतात. ही बाब विचारात घेऊन यावर्षीही माऊंट मेरी यात्रे‘ निमित्त बेस्ट उपक्रमातर्फे संपूर्ण आठवडा २८७ अतिरिक्त बसगाडया वांद्रे स्थानक (प) आणि हिल रोड दरम्यान चालवण्यात येणार आहेत.
(हेही वाचा-Maratha Reservation : मराठा आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांवर दगडफेक हा कट असण्याची शक्यता – मंत्री दीपक केसरकर)
‘माऊंट मेरी चर्च‘ येथे तसेच ‘फादर अॅग्नल आश्रम‘ या परिसरामध्ये यात्रेकरीता येणा-या प्रवाशांची गर्दी मोठया प्रमाणावर असल्यामुळे बसगाडयांचे प्रवर्तन माऊंट मेरी चर्चपर्यंत करणे शक्य नसते. परिणामी या अतिरिक्त बसगाड्या वांद्रे रेल्वे स्थानक (प) आणि हिल रोड उद्यान दरम्यान कार्यान्वित करण्यात येतील. याव्यतिरिक्त वांद्रे परिसरातून चालवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या नियमित बसमार्गावरही अतिरिक्त बसगाडया प्रवर्तित करण्यात येतील.
या यात्रे निमित्त वांद्रे स्थानक (प) आणि माऊंट मेरी चर्च परिसरात होणारी प्रवाशांची गर्दी विचारात घेऊन प्रवाशांना योग्य ते मार्गदर्शन व सहकार्य करण्यासाठी बस निरीक्षक आणि वाहतूक अधिका-यांची नियुक्तीही या संपूर्ण कालावधीत करण्यात आलेली आहे. प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे प्रवाशांना करण्यात येत आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community