‘बेस्ट’ बसमध्ये कंडक्टरशिवाय मिळणार तिकीट!

148

बेस्ट बस ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे लवकरच संपूर्ण मुंबईतील ‘रिंग रूट’वर चालणाऱ्या सर्व बसेसमध्ये कार्ड रीडर बसवण्याची योजना बेस्ट प्रशासनाने आखली आहे. मुंबईत सध्या मिनी आणि टेम्पो स्वरुपातील बसेससह सुमारे 600 वातानुकूलित बसेस आहेत. या बसेस रिंग रूटवर जवळपास 174 मार्गांवर धावतात. या रिंगरूट्सवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यापुढे कंडक्टरची वाट पाहावी लागणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू असून बेस्ट प्रशासन यासंदर्भात योजना आखत आहे अशी माहिती बेस्ट सूत्रांनी दिली आहे.

( हेही वाचा : बेस्टच्या कार्डने आता करा मेट्रो-रेल्वे प्रवास! हे कार्ड कुठे मिळणार, किंमत किती? )

टॅप केल्यावर प्रवाशांना लगेच तिकीट काढता येणार

रिंग रूटवर धावणाऱ्या एसी बससाठी ६ रुपये आणि नॉन एसी बससाठी ५ रुपये भाडे आकारले जाते. बसेसमध्ये रीडर मशिन्स बसवण्यात येतील NCMC (One Nation One Mobility Card) कार्ड आणि चलो मोबाइल अॅपवर, बेस्ट कार्डचा वापर करत प्रवासी तिकीट काढू शकतात. टॅप केल्यावर प्रवाशांना लगेच तिकीट काढता येणार आहे.

“प्रवाशांना बसच्या प्रवेशद्वाराजवळ बसवण्यात आलेल्या कार्ड रीडरवर टॅप करावे लागेल. रिंग रूट्स कॉरिडॉरवर ही सिस्टम सुरू होणार आहे” असे बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

कार्ड रीडर

या कार्ड रीडर मशीनच्या पुरवठ्यासाठी बेस्टचे अधिकारी लवकरच खासगी कंत्राटदारांकडून निविदा मागवणार आहेत. सूत्रांनी सांगितले की योजना आता प्रगत अवस्थेत आहेत आणि येत्या काही महिन्यांत बसेसमध्ये कार्ड रीडर सेवा सुरू होईल. गेल्या अनेक महिन्यांपासून कंडक्टर बस येण्यापूर्वीच थांब्यावर उभ्या असलेल्या प्रवाशांना तिकीट देत आहेत. निवडक ठिकाणी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मात्र या कार्ड रीडरमुळे प्रवास करणे अत्यंत सोपे होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.