मुंबईत ८ आणि ९ ऑगस्टला वाहतुकीत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. नेस्बिट जंक्शन, जेजे रोड नॉर्थ चॅनल पार करून सर जेजे मार्ग दक्षिण वाहिनी, सर जेजे जंक्शन, आयआर रोड पाकमोडिया स्ट्रीट जैनबिया हॉल या मार्गावर मिरवणुक असल्याने वाहतूक बंद असणार आहे. तसेच बेस्ट उपक्रमाने काही बसेसची संख्याही कमी केली आहे. यासंदर्भात मुंबई ट्रॅफिक पोलिसांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. जाणून घ्या पर्यायी व्यवस्था…
( हेही वाचा : कोकणातील करूळ घाटात संरक्षक भिंत कोसळली; वाहतूक ठप्प)
पर्यायी वाहतूक व्यवस्था
- ८ व ९ ऑगस्ट रोजी काळबादेवी रोडवरून जाणारी वाहतूक व आय.आर. मांडवी जंक्शनकडे जाणारा रस्ता मोहम्मद अली रोड, चकाला जंक्शन, एलटी मार्गे, कर्नाक बंदर पूल आणि पीडीमेलो रोड यामार्गे वळवली जाईल.
- ६० फूट रोड, ९० फूट रोड, धारावी, माहीम-सायन लिंक रोड, संत रोहिदास मार्ग, माहीम हे मार्ग दुपारी ३ ते रात्री १२ या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत.
बससंख्या कमी केली
जाफरी इंग्लिश स्कूल ते शिवाजी नगर बस स्थानक या मार्गावर धावणाऱ्या १९, ३७६, ३७५, ३५०, ४०४, ४८८, ४८९ या क्रमांकाच्या बसेस ८ आणि ९ ऑगस्टला कमी करण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp CommunityMuharram procession on August 8 and 9, 2022 will start from Honda Corner, passing Nesbit Junction, JJ Road North Channel and end at Sir JJ Marg South Channel, Sir JJ Junction, IR Road Pakmodia Street Zainbia Hall.
Alternate traffic arrangements have been made.#MTPTrafficUpdate pic.twitter.com/Q0Hos7vyed
— Mumbai Traffic Police (@MTPHereToHelp) August 8, 2022