बापरे…’चलो अ‍ॅप’मुळे कंडक्टर होणार गायब?

92

काही दिवसांपूर्वीच बेस्टने एक नवा उपक्रम सुरु करत, चलो अ‍ॅप प्रवाशांसाठी आणले होते. अवघ्या काही दिवसांतच बेस्टच्या या उपक्रमाला प्रवाशांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. चलो अ‍ॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणा-या प्रवाशांची संख्या लाखोंमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे आता बेस्ट बसचे कागदी तिकीट हद्दपार झाल्याचे दिसून येत आहे. तसेच आता कंडक्टरचीही गरज भासणार नसल्याचं चित्र दिसत आहे.

मोबाईलवर तिकीट

बेस्ट उपक्रमाने सुरु केलेल्या चलो मोबाईल अ‍ॅपवरुन वाहकाला तिकिटाचे पैसे दिल्यास, कागदी तिकीट दिले जाणार नाही. तिकीट मोबाईलवर दिसणार आहे. हीच पद्धत पासबाबत वापरण्यात आली आहे. सुमारे दीड लाख प्रवासी अशा पद्धतीने तिकीट काढत आहेत. 14 फेब्रुवारीपासून ही पद्धत बंद केली जाईल, असे बेस्ट उपक्रमाकडून कळवण्यात आले आहे.

( हेही वाचा: लता मंगेशकर यांच्या नावे अभ्यास केंद्र उभारण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाच्या अंगलट! )

बेस्टच्या खात्यात जमा होणार पैसे

चलो अ‍ॅप संलग्न असलेल्या मोबाईल वाॅलेटमधून वा कार्डच्या आधारे पैसे बेस्टच्या खाती जमा होणार आहेत. आजवर हे तिकीट दाखवल्यावर, प्रवाशांच्या विनंतीवर वाहक प्रवाशांना पूर्वीप्रमाणे कागदी तिकीट देत होता. याशिवाय या अ‍ॅपला पासही जोडण्यात आला आहे. तो दाखवल्यानंतर वाहकाकडून तिकीट घेतली जात होती. प्रवास तिकीट वा पास वैध झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रवासादरम्यान मोबाईलमधील तिकीट वा पासची डिजिटल आवृत्ती बस थांब्यावर सेवेतील बसवाहकाला दाखवणे आवश्यक आहे. वाहकाने त्याच्याकडील तिकीट वितरण मशीनच्या माध्यमातून तपशीलाची नोंद घेतल्यानंतर बसचा पास, तिकीट प्रवाशांसाठी वैध असणार आहे.

लाखो प्रवाशांकडे अ‍ॅप

चलो अॅपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. बेस्टमधून रोज सरासरी लाखांहून अधिक जण प्रवास करतात. त्यातील 5 लाख 25 हजार प्रवाशांनी चलो अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. त्यातील 1 लाख 50 हजार प्रवासी चलो अ‍ॅप वा स्मार्ट कार्डद्वारे बेस्ट तिकीट पास घेऊन प्रवास करतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.